सध्या अमेरिकेमध्ये मेजर लीग क्रिकेट (MLC) खेळले जात आहे. शुक्रवारी (26 जुलै) रोजी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात चॅलेंजर सामना खेळला गेला. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने टेक्सास सुपर किंग्जचा 10 धावांनी पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये त्यांचा सामना रविवारी (28 जुलै) रोजी वॉशिंग्टन फ्रीडमशी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या सामन्यादरम्यान कोरी अँडरसनने (Corey Anderson) अविश्वसनीय झेल घेतला. त्याचा व्हिडिओ जोरादार व्हायरल होत आहे.
या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जसमोर विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात त्यांनी 190 धावा केल्या. दरम्यान टेक्सास संघाने अवघ्या चार षटकात एकही गडी न गमावता 55 धावा केल्या होत्या. डेव्हाॅन कॉनवे (Devon Conway) आणि फाफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांच्यातील भागीदारी धोकादायक ठरत होती. यादरम्यान, पाचव्या षटकात, डू प्लेसिसने कार्मी ले रॉक्सच्या चेंडूवर हवाई शॉट खेळला.
फाफ डू प्लेसिननं मारलेला जोरदार (Faf Du Plessis) चेंडू सहजपणे सीमारेषेकडे जात असल्याचे दिसत होते. यादरम्यान कोरी अँडरसनने (Corey Anderson) हवेत झेप घेतली आणि डाव्या हाताने हा झेल टिपला. त्यानंतर फाफ डू प्लेसिसची 45 धावांची खेळी करुन तंबूत परतला.
CATCH OF THE TOURNAMENT!? 🤯 My word what a catch from Corey Anderson? 😮 #MLC2024 | #CognizantMajorLeagueCricket | #T20 pic.twitter.com/8CzruEHWP7
— Major League Cricket (@MLCricket) July 27, 2024
कोरी अँडरसनचा (Corey Anderson) मैदानावरील हा अविश्वसनीय झेल पाहून चाहते थक्क झाले. अँडरसनचे वय सध्या 33 वर्ष आहे. त्यानं हवेत झेप घेऊन अप्रतिम झेल टिपला. अँडरसनच्या या अप्रतिम झेलला मेजर लीग क्रिकेटचा (MLC) ‘कॅच ऑफ टूर्नामेंट’ मानले जात आहे.
हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर ‘या’ गोष्टीवरुन सुरू झाला वाद?
“सूर्यकुमार हंगामी कर्णधार आहे, हा खेळाडू नवीन कर्णधार बनेल…”, माजी खेळाडूच्या वक्तव्यानं खळबळ
आश्चर्यकारक! टी20 आणि एकदिवसीय क्रिकेट गाजवलेले दिग्गज खेळाडू, कसोटी क्रिकेटपासून अजूनही वंचित