भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. मागील काही आठवड्यात सिडनी येथे वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे या सामन्याबद्दल अनिश्चितता होती. मात्र काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की तिसरा सामना सिडनी येथेच खेळला जाईल. सामन्यापूर्वी कोरोना वायरसला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे.
सिडनी येथे 31 डिसेंबर रोजी 10 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे मागील दोन आठवड्यात सिडनी येथे कोरोना रुग्णांची संख्या 170 झाली आहे. एका रिपोर्टनुसार सिडनी जवळील भाग ब्ल्यू माउंटेन व इलावारा येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंड जवळच 30 किलोमीटरवर असलेले बेराला आणि स्मिथफील्ड हे भाग अलर्ट वर आहेत.
खबरदारी म्हणून स्टेडियमच्या आवारात मास्क वापरणे सक्तीचे करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तसेच ही चर्चा देखील रंगली जात आहे की प्रेक्षकांविनाही सामना खेळवला जाऊ शकतो. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की या उपायोजना अमलात आणल्या जातात अथवा नाही.
दरम्यान मागील आठवड्यातच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बॉर्डने स्पष्ट केले होते की, 7 जानेवारीपासून सुरू होणारा तिसरा सामना सिडनी येथेच खेळवला जाणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असेल की हा सामना कोणतीही समस्या न येता उत्तमपणे पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेने सुट्ट्यांमध्ये ‘हे’ काम केलं, म्हणूनच त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्या, प्रशिक्षकाचा खुलासा
आपल्या भावांसाठी कायपण.! चाहत्याने भरले भारतीय खेळाडूंच्या जेवणाचे पैसे, ट्विटरवर शेअर केला अनुभव
एमएस धोनीच्या शेतीची चर्चा परदेशात, ‘ही’ एजन्सी भाज्या विकण्यासाठी करतेय मदत