दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारताविरुद्ध ५ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे मालिकेपूर्वी ही चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता खेळाडू आणि क्रिकेट बोर्डांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली असल्याचेही सांगितले जात आहे.
तबरेज शम्सी आणि केशव महाराज हे फिरकी योग्य ठिकाणी गोलंदाजी करता यावी यासाठी सराव करताना दिसले. या सत्रात अनुभवी यष्टीरक्षक क्विंंटन डी कॉक एका ठिकाणी बसून फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहत होता, तर शम्सी आणि महाराजांनंतर अष्टपैलू एडsन मार्करमनेही फिरकी गोलंदाजीचा जोरदार सराव केला.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस सुद्धा भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सोबतच रस्सी व्हॅन डर डुसेन मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरच्या नेतृत्वाखाली फलंदाजी सरावात प्रभावी दिसला.
भारताचा संघ देखील पुढील काही दिवसांत सरावासाठी दिल्लीत दाखल होईल, असे सांगण्यात येत आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली असल्याने संघाचे नेतृत्व केएल राहुल करेल. शिवाय अनेक नवीन खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, टी२० मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताला अद्याप टी२० मालिका जिंकता आलेली नाही. पाहुण्या संघाने २०१६मध्ये दोघांमधील पहिली मालिका जिंकली होती. त्याच वेळी २०१९ मधील मालिका १-१ अशी बरोबरीत पार पडली. त्यामुळे आता भारत या मालिकेत विजय मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसेल.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जर भारतात पहिल्या दिवशी १७ विकेट पडल्या असत्या, तर…’, दिग्गजाचा इंग्लंडवर निशाणा
बाबो! IPLच्या एका सामन्याची किंमत होणार १०० कोटी? बनू शकते जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स प्रॉपर्टी