काल भारत विरुद्ध न्यूझीलँड सामना ज्या द स्पोर्ट्स हब, तिरुअनंतपुरमच्या मैदानावर झाला ते देशातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होते. १९३३ साली बॉम्बे जिमखानाने भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद भूषवले होते.
भारतात आजपर्यंत एकूण ५० आंतरराष्ट्रीय मैदानांपैकी कालचे द स्पोर्ट्स हब, तिरुअनंतपुरमचे स्टेडियम हे १९वे मैदान होते ज्यावर आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला.
काल याच मैदानाच्या नावावरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. काही याला ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम म्हणत होते तर काही द स्पोर्ट्स हब. परंतु अधिकृत संकेतस्थळावर याचे नाव द स्पोर्ट्स हब असेच आहे. जसे हे मैदान सुंदर आहे तशीच याची वेबसाईटही सर्व माहितीने परिपूर्ण आहे.
५० आंतरराष्ट्रीय मैदानांपैकी ७ स्टेडियम एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यात मुंबईतील ३, पुणे आणि नागपूरमधील २ स्टेडियमचा समावेश आहे. यातील केवळ वानखेडे स्टेडियम,मुंबई, एमसीए स्टेडियम, पुणे आणि व्हीसीए स्टेडियम,नागपूरवर आता आंतरराष्ट्रीय सामने होतात.
इंग्लंड देशात क्रिकेट शोध लागला असे नेहमी म्हटले जाते परंतु त्या देशातही भारताच्या अर्धी अर्थात २३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत. तर बांगलादेशमध्ये केवळ ८ आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्टेडियम असलेले देश
५० भारत
२३ इंग्लंड
२१ ऑस्ट्रेलिया
२१ पाकिस्तान
१६ दक्षिण आफ्रिका
१६ न्यूझीलँड
१५ विंडीज
१० श्रीलंका
८ बांगलादेश