सीपीएल २०२० मधील आपले सलामीचे सामने हरलेले दोन संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सला त्रिनबॅगो नाईट रायडर्सकडून तर पॅट्रीयॉट्सला गतविजेते बार्बाडोस ट्रायडंटसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघ गुणतालिकेत गुणांचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असतील.
गयानाचा कर्णधार ख्रिस ग्रीनला हेटमायर, ब्रेंडन किंग, रॉस टेलर, इम्रान ताहीर व नवोदित नवीन उल-हक या खेळाडूंकडून अपेक्षा असतील. दुसरीकडे, पॅट्रीयॉट्सच्या फलंदाजांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. कर्णधार रियाद इमरितच्या नेतृत्वात शेल्डन कॉट्रेल व सोहेल तन्वीर या अनुभवी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, ख्रिस लीन, इविन लुईस, दिनेश रामदीन या खेळाडूंना आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी करता आली नाही.
सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स संभावित ११
ख्रिस लिन, इविन लुईस, जोशुआ दा सिल्वा, बेन डंक, दिनेश रामदीन ( यष्टीरक्षक ), जाहमार हॅमिल्टन, सोहेल तन्वीर, रियाद इमरित ( कर्णधार ) शेल्डन कॉट्रेल, इश सोढी, अल्झारी जोसेफ
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संभावित ११
ब्रेंडन किंग, चंद्रपाल हेमराज, शिमरन हेटमायर, रॉस टेलर, निकोलस पूरन ( यष्टीरक्षक ), शेरफान रुदरफोर्ड, कीमो पॉल, ख्रिस ग्रीन ( कर्णधार ), नवीन उल-हक, इम्रान ताहिर, रोमारियो शेफर्ड
महास्पोर्ट ड्रीम ११
यष्टीरक्षक
१) निकोलस पूरन
वेस्टइंडीजचा वर्तमान व भविष्य ज्याला म्हटले जाते तो निकोलस पूरन २०२० सीपीएल गाजवायला सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात तो केवळ १८ धावा बनवू शकला होता. मात्र, सर्वजण त्याची क्षमता जाणून आहेत.
२) जोशुआ दा सिल्वा
स्पर्धेआधीच सिल्वाच्या नावाची खूप चर्चा होती. पहिल्या सामन्यात प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर सिल्वाने एक बाजू लावून धरली. मात्र, धावगती वाढविण्यात तो अपयशी ठरला. पुढील सामन्यात तो ही कमतरता देखील भरून काढेल. संपूर्ण हंगामात सिल्वाच्या नावे सर्वाधिक धावा लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.
फलंदाज
१) शिमरन हेटमायर
पहिल्याच सामन्यात गयानासाठी त्यांचा प्रमुख फलंदाज हेटमायर फॉर्ममध्ये असल्याचे संकेत मिळाले आहेत. हेटमायरने टिकेआर विरुद्ध गयानासाठी ४४ चेंडूत सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली होती.
२) ब्रेंडन किंग
मागील हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असलेल्या किंगची या सीपीएल मोसमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यात तो खातेही खोलू शकला नाही. मात्र, किंगसारखा खेळाडू अपवादाने अपयशी ठरत असतो. सोबतच, पहिल्या सामन्यात त्याने तीन झेल घेत क्षेत्ररक्षणात योगदान दिले होते.
३) ख्रिस लिन
टी२० चा आदर्श खेळाडू असलेला लिन पहिल्या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात मात्र, तो पहिल्या सामन्यातील अपयश धुऊन काढण्याचा प्रयत्न नक्की करेल. पॅट्रीयॉट्सला या हंगामात चमकदार कामगिरी करायची असेल तर, लिनवर संघाची बरीचशी मदार आहे.
४) बेन डंक
पाकिस्तान सुपर लीगमधील फॉर्मची झलक डंकने पहिल्या सामन्यात दाखवली आहे. बार्बाडोस विरुद्ध २१ चेंडूत ३४ धावा करत त्याने सामन्यात रंगत आणली होती. आज त्याच्याकडून, या पेक्षाही मोठ्या कामगिरीची अपेक्षा पॅट्रीयॉट्स संघाला आहे.
अष्टपैलू
१) कीमो पॉल
गयानाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू कीमो पॉलने पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने झटपट १५ धावांचे योगदान दिले होते. गोलंदाजीत ३ षटके टाकताना २१ धावा देत १ बळी त्याच्या नावे होता. सोबतच, पॉल चमकदार क्षेत्ररक्षण ही करतो.
२) सोहेल तन्वीर
दिग्गज टी २० गोलंदाज असलेला तन्वीर वेळप्रसंगी फलंदाजीतही चांगले हात दाखवतो. पहिल्या सामन्यात तन्वीरने ४ षटकात २५ धावा देत २ बळी मिळवले होते. फलंदाजीत देखील १६ धावांवर तो नाबाद राहिला.
गोलंदाज
१) इम्रान ताहीर
चाळीशी पार करून गेलेल्या ताहीरमध्ये अजूनही २० वर्षाच्या तरुणासारखा उत्साह आहे. पहिल्या सामन्यात ताहीरने चार षटकात ४० धावा देत सुनील नारायण व कायरन पोलार्ड हे मोहरे टिपले होते.
२) शेल्डन कॉट्रेल
वेस्ट इंडीजचा वर्तमान काळातील, मर्यादित षटकातील सामन्यांचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून कॉट्रेलकडे पाहिले जाते. कॉट्रेलने बार्बाडोस विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात अवघ्या १६ धावा देत दोन बळी घेतले होते. संपूर्ण स्पर्धेमध्ये कॉट्रेलच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.
३) अल्झारी जोसेफ
पहिल्या सामन्यात काहीसा महागडा ठरलेला जोसेफ दुसऱ्या सामन्यात ते अपयश धुवून काढू शकतो. जोसेफच्या वेगवान चेंडूंचा सामना करणे, अनेकदा फलंदाजांसाठी जिकिरीचे होऊन बसते.