नवी दिल्ली। जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग २०२०चे आयोजन पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. तत्पूर्वी सुरू असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगकडे एकप्रकारे सराव म्हणून पाहिले जात आहे. या सीपीएल स्पर्धेदरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. आतापर्यंत आपण पाहिले असेल की, क्रिकेटचे अधिकतर सामने हे पावसाच्या व्यत्ययामुळे थांबले आहेत. परंतु सीपीएलमधील एक सामना उशिरा सुरू होण्याचे वेगळेच कारण होते.
झाले असे की, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे ब्रायन लारा क्रिकेट स्टेडिअममध्ये ज्या खेळपट्टीवर गयाना अमेझॉन वॉरिअर्स आणि जमैका तलावाह्ज संघात सामना खेळला जाणार होता, तिथे चुकून चेंडू खेळपट्टीवर दबला गेला. चेंडू बाहेर काढण्यास उशीर झाला, त्यामुळे सामन्याची सुरुवात करण्यास वेळ लागला.
खरं तर पिच क्यूरेटर या खेळपट्टीवर सामना सुरू होण्यापूर्वी रोलरने रोल करत होते. याचदरम्यान रोलरखाली एक चेंडू आला आणि ते कोणाच्याही लक्षात आले नाही. रोल केल्यानंतर समजले की चेंडू खेळपट्टीवर दबला गेला आहे आणि त्याचा थोडा भाग हा बाहेर आला आहे.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी आयोजक आणि खेळाडूंनी हे पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले. आयोजकांनी खेळपट्टी दुरुस्त करण्यासासाठी सामना उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दबलेला चेंडू जेव्हा खेळपट्टीवरून बाहेर काढण्यात आला, तेव्हा तिथे मोठा खड्डा झाला, जो व्यवस्थित भरण्यासाठी वेळ लागला.
https://twitter.com/nibrazcricket88/status/1297783007487700994
या सामन्यात गयाना अमेझॉन वॉरिअर्सने प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा करत सीपीएल इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान जमैका तलावाह्ज संघापुढे ठेवले. गयाना संघाने ११९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जमैका तलावाह्ज संघाला निर्धारित २० षटकात १०४ धावांवर रोखले आणि सामना १४ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
-गिब्ज, विराटला वगळत रैनाने निवडले जगातील सर्वात्तम ५ क्षेत्ररक्षक
-क्रिकेटमध्ये चुकीच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला केकेआरचा कर्णधार म्हणतो योग्य, पण…
-चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक
ट्रेंडिंग लेख-
-सेहवाग, गंभीर, विराट अशा दिल्लीकरांचे क्रिकेट करियर घडवणारा राजकारणी नेता
-‘या’ ५ क्रिकेटर्सच्या नावाची गंमतच वेगळी, मोठ्या शहरांची आणि यांची नावं आहेत सारखी
-मुंबईकरां शिवाय टीम इंडियाचं ‘पान’ही हलत नाही, जाणून घ्या काय आहे कारण