पुणे, 25 जानेवारी 2024: सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल)2024 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत साखळी फेरीत डायमंड डॅगर्स संघाने 7, 9 वर्षाखालील गटात सुरेख कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पोर्टस फाऊंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 7 वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात श्रीहान जाधव(21मि) याने केलेल्या एक गोलाच्या जोरावर डायमंड डॅगर्स संघाने मॅट्रिक मार्व्हल्स संघाचा 1-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात डायमंड डॅगर्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताजचा 3-2 असा पराभव केला. विजयी संघाकडून रियांश कदम(13, 17मि.)ने दोन गोल, तेजस पाटील(19मि.)ने एक गोल केला. याचा गटात डायमंड डॅगर्स संघ आदित्य ऑलस्टार्स संघाविरुद्ध अंतिम लढत होणार आहे.
9 वर्षाखालील गटात रुद्र काळभोर(11मि.), अनुज शिरोटे(21मि.)यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर डायमंड डॅगर्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघाचा 2-0 असा पराभव केला. मॅट्रिक मार्वल्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघावर 2-0 असा विजय मिळवला. मॅट्रिक मार्वल्सकडून खेमराज धुमाळ(20मि.), हर्षद कोठावळे(24मि.) यांनी गोल केले. या गटात अंतिम फेरीत डायमंड डॅगर्स संघ मॅट्रिक मार्वल्स संघाशी झुंजणार आहे.
निकाल: 7 वर्षाखालील गट:
डायमंड डॅगर्स: 1 (श्रीहान जाधव 21मि.)वि.वि.मॅट्रिक मार्व्हल्स: 0
आदित्य ऑलस्टार्स: 3 (ऋग्वेद पडवळ 6, 12, 21मि.) पराभुत वि.कॉन्स्टिलेशन चिताज: 5 (रुद्रांश विरुटकर 4, 8, 13, 20, 25मि.)
डायमंड डॅगर्स: 3 (रियांश कदम 13, 17मि. तेजस पाटील 19मि.) वि.वि. कॉन्स्टिलेशन चिताज: 2 (वृशांक काटकर 9, 21मि.)
मॅट्रिक मार्व्हल्स: 0 पराभुत वि.आदित्य ऑलस्टार्स: 1 (ऋग्वेद पडवळ 19मि.)
डायमंड डॅगर्स: 1 (श्रीहान जाधव 18मि.) पराभुत वि.आदित्य ऑलस्टार्स: 2 (ऋग्वेद पडवळ 9, 17मि.)
मॅट्रिक मार्व्हल्स: 0 पराभुत वि.कॉन्स्टिलेशन चिताज: 2 (वृशांक काटकर 9मि., रुद्रांश विरुटकर 19मि.)
9 वर्षाखालील गट:
डायमंड डॅगर्स: 0 बरोबरी वि.मॅट्रिक मार्व्हल्स: 0
आदित्य ऑलस्टार्स: 0 पराभुत वि. कॉन्स्टिलेशन चिताज: 1 (सनमित साळुंखे 13मि.)
डायमंड डॅगर्स: 2 (रुद्र काळभोर 11मि., अनुज शिरोटे 21मि.) वि.वि.कॉन्स्टिलेशन चिताज: 0
मॅट्रिक मार्वल्स: 1 (आदिराज बांगर 23मि.)वि.वि.आदित्य ऑलस्टार्स: 0
डायमंड डॅगर्स: 0 बरोबरी वि.आदित्य ऑलस्टार्स: 0
मॅट्रिक मार्वल्स: 2 (खेमराज धुमाळ 20मि., हर्षद कोठावळे 24मि.) वि.वि.कॉन्स्टिलेशन चिताज: 0
11 वर्षाखालील गट:
निरागस नाईट्स: 2 (दिविज जरग 12मि., शिवराज साळुंखे 18मि.)वि.वि.गोल्डन गार्डियन्स: 0
जीएनएस गनर्स: 2 (आयुष सिंग 9मि., देवांश अधागळे 15मि.) बरोबरी वि.टायगर क्युब्स: 2 (अवनीश जोशी 13, 21मि.)
निरागस नाईटस: 1(दर्शिल जैन 21मि.)वि.वि.टायगर क्युब्स: 0
जीएनएस गनर्स: 2(वेद अंजनीकर 13, 17मि.)वि.वि. गोल्डन गार्डियन्स: 1 (विश्वेश चौरे 18मि.)
निरागस नाईट्स: 1 (लव अरुंधती 13मि.) वि.वि.जीएनएस गनर्स: 0
गोल्डन गार्डियन्स: 2 (देव चोपडे 18मि., युझरसीफ शेख 21मि.)वि.वि.टायगर क्युब्स: 1 (अवनीश जोशी 11मि.)
13 वर्षाखालील गट:
निरागस नाईट्स: 2 (कैलाश चौधरी 12मि., सोहम जाधव 20मि.)बरोबरी वि. प्रबल पँथर्स:2 (स्वयम पाटील 14, 25मि.)
गोल्डन गार्डियन्स: 0 पराभूत वि.डीसी ड्रॅगन्स: 3 (शिवराज पाटील 11मि., अयान सुलतान 15मि., इशान एस. निशांत 22मि.)
जीएनएस गनर्स: 0 पराभुत वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 2 (सार्थक बिंगोले 14,22मि.)
प्रबल पँथर्स: 5 (निर्वाण वानखेडे 5मि ., हर्ष अग्रवाल 8मि., आदित्य वाळुंजकर 12मि., पार्थ घोडके 19मि., अनय जाधव 23मि.)वि.वि.सक्सेस स्ट्रायकर्स: 0
निरागस नाईट्स: 3 (कैलास चौधरी 13, 19, 23मि )वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 2(शुभंकर पांडे 9मि., गौरव पाटील 15मि.);
गोल्डन गार्डियन्स: 5 (आमोद अमृतकर 6, 14मि., मानस पाटील 11मि., मल्हार घोलप 20, 25मि.)वि.वि.सक्सेस स्ट्रायकर्स: 3 (विश्वविजय काटकर 10, 13मि., विहान जरंडे 18मि.)
जीएनएस गनर्स: 0 पराभुत वि.प्रबल पँथर्स:2 (आदिनाथ अहबे12मि., स्वयम पाटील 18मि.)
टायगर क्युब्स:0 पराभुत वि.डीसी ड्रॅगन्स: 1(इशान एस. निशांत 22मि.);
निरागस नाईट्स: 2 (सोहम जाधव 9मि., कैलाश चौधरी 15मि.)बरोबरी वि.सक्सेस स्ट्रायकर्स: 2 (सोहम उगिले 18, 24मि.)
गोल्डन गार्डियन्स: 0 बरोबरी वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 0
जीएनएस गनर्स: 1 (नील चव्हाण 5मि.)पराभुत वि.डीसी ड्रॅगन्स:4 (इशान एस. निशांत 10, 15, 18मि., अयान मुलाणी 25मि.);
टायगर क्युब्स: 1(वेदांत राणे11मि.)बरोबरी वि.प्रबल पँथर्स: 1(आदिनाथ अहबे12मि.)