भारतीय संघाला आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाज लाभले आहेत. सचिन तेंडुलकर याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतकांचा विक्रम देखील आहे. विराट कोहली लवकरच सचिनच्या 100 शतकांचा विक्रम मोडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे पाहता, कसोटी, वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. पण कसोटी आणि वनडेच्या तुलनेत टी-20 आतरराष्टरीयमध्ये भारताच्या अवघ्या 9 फलंदाजांनी शतके केली आहेत. आपण या लेखात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतके करणाऱ्या दोन फलंदाजांवर नजर टाकणार आहोत.
सर्वात जलद टी20 आंतरराष्ट्रीय शतक लावणारे दोन भारतीय फलंदाज
2. सूर्यकुमार यादव – 45 चेंडू
सूर्यकुमार यादव मैदानात आपल्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याला मिस्टर 360 असेही म्हटले जाते. भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान शतक सूर्यकुमारच्या नावावर आहे. त्याने 7 जानेवारी 2023 रोजी राजकोट येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 45 चेंडूत शतक झळकावले होते. त्याने या सामन्यात एकूण 51 चेंडू खेळले. यात 7 चौकार आणि 9 षटकारच्या मदतीने 112 धावांची अफलातून खेळी साकारली. भारतीय संघाने या सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी मात दिली. आर्शदीप सिंगने 3 विकेट्स घेतल्या होत्या.
1. रोहित शर्मा – 35 चेंडू
रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. रोहितच्या नावावर एक-दोन नाही तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 4 शतकांची नोंद आहे. भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक देखील कर्णधार रोहितच्याच नावावर आहे. 22 डिसेंबर 2017 रोजी रोहितने हा विक्रम नावावर केला. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात अवघ्या 35 चेंडूत त्याने शतक साकारले होते. या सामन्यात त्याने एकूण 43 चेंडू खेळले आणि 118 धावांचे योगदान संघसाठी दिले. यात 12 चौकार आणि तब्बल 10 षटकारांचा समावेश होता. भारतीय संघ या सामन्यात 88 धावांनी विजयी झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
NZ vs PAK । कर्णधार विलियम्सनला पुन्हा दुखापत, न्यूझीलंड संघ आणि चाहत्यांच वाढलं टेंशन
‘आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा’, प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठे आधी पाकिस्तानातून जय श्रीरामचा नारा