कुकाबुरा या क्रिकेटचे साहित्य तयार करणाऱ्या कंपनीने टी-२० क्रिकेटसाठी एक खास प्रकारचा चेंडू तयार केला आहे.
याची घोषणा कुकाबुराने ट्विटर वरुन रविवारी (८ जुलै) केली आहे.
The new Turf20 ball is being trialled in the NT Strike League @NTCricket , a world-first for the T20 specific ball. Players like @ARoss49 have enjoyed it so far, we’ll do more trials over the next 18 months. pic.twitter.com/S6PHrdbFp1
— Kookaburra Cricket (@KookaburraCkt) July 8, 2018
‘टर्फ २०’ या नावाने टी-२० क्रिकेटशी जुळणारा हा खास चेंडू तयार करण्यात आला आहे.
सध्या कुकाबुराचाच वापरला जाणारा पांढरा चेंडू आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये होणाऱ्या फटकेबाजीमुळे लवकर खराब होतो.
यावर उपाय म्हणुन हा टणक कवचाचा चेंडू तयार केला आहे. तसेच यामधून चेंडू आणि बॅटमधील योग्य समतोल साधण्यास मदत होणार आहे.
कुकाबुरा कंपनीला आशा आहे की २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टि-२० विश्वचषकात आयसीसी हा चेंडू वापरण्यास परवानगी देईल.
२०२० च्या टी-२० विश्वचषका पूर्वी हा ‘टर्फ २०’ चेंडू जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणार आहे.
सध्या हा चेंडू नॉदर्न टेरिटोरी स्ट्राइक लीग या ऑस्ट्रेलियाती देशांतर्गत स्पर्धेत प्रायेगिक तत्वावर वापण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?
-जूलै महिन्यात जन्माला या, टीम इंडियाचा कर्णधार बना!