२०२० आयपीएल स्पर्धा UAE मध्ये होऊ शकते. कारण कोरोना विषाणूच्या महामारीमुळे भारताने परदेशात आयपीएल आयोजन करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे आयोजन करण्याची इच्छा UAE क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. आता बीसीसीआय देखील UAE क्रिकेट बोर्डाच्या या इच्छेवर गंभीरपणे विचार करीत आहे.
काय आहेत ती ५ कारणे, ज्यामुळे असे म्हणता येईल की आयपीएल २०२० ही UAE मध्ये आयोजित करण्यासाठीचा एक चांगला पर्याय असेल.
१. UAE मध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण आहे कमी
UAE मध्ये कोरोना विषाणूचा प्रमाण सध्या इतर देशांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत जवळपास ५०००० केस आहेत, त्यापैकी ३९००० लोक बरे झाले आहेत. आणि ३१८ लोक कोरोनाने मरण पावले आहेत.
भारताच्या तुलनेत UAE मध्ये कोरोनाचे प्रमाण फारच कमी आहे. आतापर्यंत आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ७ लाख १९ हजार ६६५ कोरोना बाधित लोकांपैकी कोरोनामुळे २० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर ५ लाखाच्या आसपास लोक बरे झाले आहेत.
अशा परिस्थितीत, UAE मध्ये आयपीएल २०२० आयोजित करणे हा बीसीसीआयसाठी योग्य पर्याय आहे.
२. केलं होतं २०१४ मध्ये देखील यशस्वी नियोजन
आयपीएल २०१४ चा अर्धा हंगाम UAE मध्ये खेळला गेला होता. कारण तेव्हा लोकसभा निडणुक भारतामध्ये सुरु होती.
UAE मध्ये खेळलेल्या आयपीएल २०१४ चं नियोजन खूप चांगलं होतं. UAE क्रिकेट बोर्डने आयपीएल २०१४ ची चांगली व्यवस्था केली होती. त्यामुळे बीसीसीआय आणि क्रिकेट मंडळ तेव्हा खूप खुश होते.
३. कमी अंतरावर आहेत २ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
UAE मध्ये २ असे आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत, जे खूप प्रसिद्ध आहेत. एका स्टेडियमचे नाव “दुबई स्पोर्ट्स सीटी क्रिकेट स्टेडियम” आहे. त्याला “दुबई क्रिकेट स्टेडियम” या नावाने देखील ओळखले जाते. तर दुसरे स्टेडियम आहे “दुबई शेख जायद क्रिकेट स्टेडियम“. या दोन्ही स्टेडियम मधील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे खेळाडूंना सहज आणि कमी वेळात प्रवास करत सामने खेळता येईल.
या दोन्ही स्टेडियममध्ये आयपीएल २०२० चे आयोजन होऊ शकतं. त्यामुळे बीसीसीआयला याचा फायदा होऊ शकतो आणि कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे खेळाडूंना जास्त लांबचा प्रवासही होणार नाही.
४. UAE मध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौरा नाही
येणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमुळे ऑक्टूबर-नोव्हेंबरमध्ये कोणत्याही सामन्यांचं नियोजन UAE मध्ये नाही. तिथे कोणताही आंतरराष्ट्रीय दौरा नाही. त्यामुळे स्टेडियम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्णपणे खाली मिळू शकते.
कोणताही आंतरराष्ट्रीय दौरा नसल्यामुळे बीसीसीआयकडे एक उत्तम उपाय आहे कि, आयपीएल २०२० चे आयोजन UAE मध्ये होऊ शकेल. त्यामुळे बीसीसीआयला स्टेडियमची कमी नाही भासणार आणि ते आयपीएलचे यशस्वी आयोजन करू शकतात.
५. सध्या देऊ शकते UAE खेळाडुंच्या सुरक्षिततेसह टॅक्समध्येही सूट
सध्या खेळाडूंना सुरक्षा देणे हि कोणत्याही देशातील सरकार पुढे समस्या आहे. परंतु, UAE सरकार या खेळाडूंना सुरक्षा देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे खेळाडूंना सुरक्षा मिळू शकते.
त्याचबरोबर UAE सरकार टॅक्समध्येही सूट देऊ शकते, याचा बीसीसीआयला जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून ह्या दोन कारणांमुळे देखील आयपीएल २०२० चे आयोजन UAE मध्ये केल्याने बीसीसीआयला मोठा फायदा होईल.