ऑस्ट्रेलियाचा माजी उप कर्णधार आणि यष्टीरक्षक अॅ़डम गिलक्रिस्ट त्याच्या तडाखेबंद फलंदाजीसोबत, मैदानावरील सभ्य वागणुकीसाठी प्रसिद्ध होता.
त्याच्या याच सभ्य आणि प्रामाणिक वागणुकीमुळे गिलक्रिस्टने 2003 साली साऱ्या क्रिकेट विश्वाची मने जिंकली होती.
2003 सालच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, गिलक्रिस्टने फलंदाजी करताना पंचानी बाद घोषित करायच्या आधी मैदान सोडले होते.
किस्सा असा आहे की, अरविंद डिसिल्वाच्या गोलंदीजीवर कुमार संगाकाराने यष्टीमागे झेल घेत गिलक्रिस्ट बाद असल्याची अापील केली. मात्र पंचानी बाद घोषीत करायच्या आधीच गिलक्रिस्टने मैदान सोडले होते.
याप्रकरणी पंचानी बाद घोषीत करायच्या आधीच मैदान का सोडले याचा खुलासा तब्बल 15 वर्षानंतर स्वत: अॅ़डम गिलक्रिस्टने नुकताच केला आहे.
“मी, स्टुअर्ट मॅकगिल आणि जस्टिन लेॅंगर, रॉड मार्श यांच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट अॅकॅडमीसाठी एक सामना खेळलो होतो. त्या सामन्यात माझ्या बॅटला मोठा कट लागून तो यष्टीरक्षकाकडे गेला होता. तरीही मला पंचांनी बाद घोषित केले नव्हते. त्या सामन्यात पुढे मी शतक केले होते. मात्र सामन्यानंतर मी दुखी झालो होतो. मला माझ्या अप्रामाणिकपणाची लाज वाटत होती. त्यामुळे मी 2003 साली श्रीलंके विरुद्धच्या उपांत्य सामन्यात बाद झाल्यानंतर पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता मैदान सोडले.” एका क्रीडा वाहिनीशी बोलताना गिलक्रिस्टने हा खुलासा केला.
त्यावेळी गिलक्रिस्टने त्याच्या या प्रामाणिकपणाबद्धल जगभरातील क्रिकेट रकिकांची मने जिंकली होती.
2003 च्या या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कामगिरी करत विश्वविजेतेपद मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूचे नाव
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड