विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. चाहत्यांना आणि क्रिकेट रसिकांना ओढ लागली ती म्हणजे अंतिम सामन्याची. या संपूर्ण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाडूंनी एकसो एक प्रदर्शन केले. फक्त न्यूझीलंडचा कसोटी दौरा सोडल्यास बाकी सगळ्या ठिकाणी भारताची विजयी घोडदौड चालू होती. संपूर्ण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने काही ठिकाणी सामन्यात असे विक्रम केले आहेत जे गेल्या दोन वर्षात एकाही संघाने केले नाहीत.
१)भारत विरुद्ध वेस्टइंडीज- भारतीय संघ दोन वर्षापूर्वी वेस्टइंडीज दौऱ्याला गेला होता. हा सामना वेस्ट इंडिजच्या नॉर्थ साउंडच्या मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेची फलंदाजी खूप चालली. सामन्यात अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ८१ आणि दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने ऑगस्ट २०१९ला वेस्ट इंडीज संघाला ३१८ धावांनी पराभूत केले. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एवढ्या मोठ्या फरकाने फक्त भारतीय संघ जिंकला.
२)भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- २०१९ ला दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दक्षिण आफ्रिका संघाला भारतीय संघाने ३-०च्या फरकाने हरविले होते. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात ४९७ धावांचा डोंगर उभा केला. त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात १६२ तर, दुसऱ्या डावात फक्त १३२ धावत गारद झाला. भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि २०२ धावांनी जिंकला. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एक डाव आणि इतक्या फरकाने केवळ भारतीय संघ जिंकला असून हा सुद्धा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एक विक्रम आहे.
३)भारत विरुद्ध इंग्लंड- इंग्लंड संघ भारतात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनिम्मित ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. या मधील २ सामने चेन्नई तर उरलेले २ सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात आले. अहमदाबादमध्ये ‘गुलाबी चेंडू’ने खेळला गेलेला सामना भारतीय संघाने केवळ दोन दिवसात संपवला. भारतीय संघाने हा सामना १० गडी राखून जिंकला. १० गडी राखून सामना जिंकण्यामध्ये भारतीय संघासोबत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सुद्धा आहेत. या सामन्यात रोहित शर्माने ६६ धावा केल्या तर, अक्षर पटेलने सामन्यात ११ गडी बाद करून सामनावीराचा पुरस्कार मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
WTC Final: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल
भारतीय महिला संघाने कसली कंबर, ऐतिहासिक सामन्यासाठी झाल्या सज्ज