क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) २०२१ वर्षासाठीचे आपले वार्षिक पुरस्कार पुरस्कार जाहीर केले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दरवर्षी पुरस्कार देते. वर्षभर सातत्याने चांगली कामगिरी करणारे खेळाडू या पुरस्काराचे पात्र ठरतात. यावर्षी कोणाला पुरस्कार कोणता मिळाला, याबाबत आपण जाणून घेऊया. (Cricket Australia Annual Awards 2021)
ऑस्ट्रेलियाची वरिष्ठ महिला क्रिकेटपटू ऍश्ले गार्डनर हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू साठी दिल्या जाणाऱ्या बेलिंडा क्लार्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासाठी तीला ५४ मते मिळाली. गार्डनरने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये तीने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ७३ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली होती.
पुरुष गटात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. स्टार्कने १०७ मतांसह ऍलन बॉर्डर पदक (Mitchell Starc Won Allen Border Medal) जिंकले. आपल्या संघाला पहिला टी२० विश्वचषक मिळवून देण्यात स्टार्कने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऍशेस मालिकेत त्याने दमदार कामगिरी करताना पाच सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या होत्या. वर्षातील सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिचेल स्टार्कला मिळाला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत चमकदार कामगिरी करणारा फलंदाज ट्रेव्हिस हेडला वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून घोषित केले आहे. हेडने ऍशेस मालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतके झळकावली होती. त्याने या पुरस्काराच्या शर्यतीत स्कॉट बोलँड आणि स्टार्कला मागे टाकले. (Travis Head)
एलिसा हिली हिला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वनडे क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने गेल्या वर्षी ४४.५० च्या सरासरीने २६७ धावा केल्या होत्या. तिचा पती मिचेल स्टार्क हादेखील या गटात पुरुष विभागात विजेता राहिला.
मिचेल मार्शला वर्षातील सर्वोत्कृष्ट टी२० क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी हा पुरस्कार महिला गटात बेथ मुनीला मिळाला आहे. हा पुरस्कार मुनीच्या वाट्याला येण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. मार्शने मागील वर्षी २१ टी२० सामन्यात ६२७ धावा केल्या होत्या. तसेच तो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिलेला.
वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला देशांतर्गत क्रिकेटपटूचा पुरस्कार एलिस विलानीला आणि पुरुष गटात ट्रॅव्हिस हेडला देण्यात आला. बटी विल्सन युवा महिला क्रिकेटरचा पुरस्कार डार्सी ब्राउनला आणि ब्रॅडमन युवा पुरूष क्रिकेटरचा पुरस्कार टीम वॉर्डच्या नावे झाला.
ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि रेली थॉम्पसन यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
ऍश्ले बार्टी बनली ऑस्ट्रेलियन ओपनची सम्राज्ञी! (mahasports.in)