क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरुषांचा टी20 विश्वचषक आधीच्या वेळापत्रकाप्रमाणेच आयोजीत करण्याचा मानस व्यक्त केला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या.
क्रिकेटमध्येही अनेक स्पर्धांना याचा फटका बसला असून पुढील 20 दिवस जगात कुठेही कोणत्याही प्रकारचे सामने होणार नाहीत.
याच पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्वचषक आयोजनावर कोरोनाचे सावट होते. परंतु आता ते दुर झाले आहे.
“आम्हाला अपेक्षा आहेत की काही आठवडे किंवा महिन्यात सर्व प्रकारचे खेळ पुन्हा सुरु होतील, ” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रोबर्ट यांनी cricket.com.au बरोबर बोलताना सांगितले आहे.
“आम्ही या परिस्थितीत भाष्य करण्यासाठी कोणतेही तज्ञ नाही आहोत. परंतु जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिना येईल तेव्हा सर्व ठिक झालेले असेल. यामुळे विश्वचषक वेळापत्रकाप्रमाणेच होईल. ”
पुरुषांचा आयसीसी टी20 विश्वचषक 24 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे तर प्री क्वाॅलिफायर 18-23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. यात 12 संघ सहभागी होतील. अंतिम सामना 15 नोव्हेंबर 2020 ला होणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी-
– जर आयपीएल रद्द झाली तर विराट-रोहितचे किती होणार नुकसान
– आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
–राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; गोलंदाजाचा झाला भीषण अपघात
– आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?