मुंबई । गुरुवारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपण बाप होणार असल्याचे सांगितले. विराटने सांगितले की, त्यांची पत्नी अनुष्का शर्मा गर्भवती आहे आणि पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये एक नवीन पाहुणा त्यांच्या घरी येईल. कोहलीकडून ही बातमी मिळाल्याचा आनंद कोटयवधी चाहत्यांना झाला आहे, पण या वृत्ताने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची झोप उडाली आहे. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द कुरिअर मेलने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
कारण यावर्षी डिसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेसह मर्यादीत षटकांच्या मालिका होणार आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत. त्याच्या आक्रमकतेचे ऑस्ट्रेलियन चाहते देखील आहेत. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये कोट्यवधी भारतीय नागरिक राहत आहेत आणि जर विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आला नाही तर त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बरेच नुकसान होऊ शकते. मालिकांदरम्यान चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नसली तरी तरीही त्याचा परिणाम थेट प्रक्षेपणात दिसून येऊ शकतो.
कोविड 19 साथीच्या आजारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे खूप नुकसान झाले आहे. त्यांनाही आपल्या कर्मचार्यांना काढून टाकावे लागले. आता ऑस्ट्रेलियाच्या आशा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, वनडे आणि टी -20 मालिकेवर आहेत. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे 300 दशलक्ष डॉलर्स खर्च होणार आहेत. कोरोनानंतर क्रिकेट परतले आहे आणि भारतीय संघ साहजिकच ऑस्ट्रेलियाला जाईल, पण विराट कोहली न गेल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नुकसान होऊ शकते.
शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर बंदी असल्यामुळे खेळू शकले नाहीत. यावेळी हे दोन्ही खेळाडू विराट आणि संघाची प्रतीक्षा करीत आहेत. पण आपल्या पत्नीच्या गरोदरपणामुळे विराट कोहली ऑस्ट्रेलियात गेला नाही तर चाहते नाराज होतील.