कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगातील क्रीडा विश्वाला फटका बसला होता. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या. भारतीय क्रिकेट संघालाही याचा फटका बसला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ पुन्हा मैदानावर उतरला.
कोरोनानंतरचा पहिला आंतरारष्ट्रीय सामना भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच देशात खेळला. नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. कोरोना विषाणूच्या सावटाखाली खेळल्या गेलेल्या या मालिकेत मात्र कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. हा संपूर्ण दौरा जैव सुरक्षित वातावरणात यशस्वीपणे पार पाडला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याच कारणाने आता दौरा संपल्यानंतर बीसीसीआयचे आभार मानणारे खुले पत्र लिहिले आहे. आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ते जाहीर केले आहे. या पत्रात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मालिका आयोजनात सहकार्य केल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या संकटकाळातही मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय संघाचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले आहेत.
An open letter to our friends in Indian Cricket, and to everyone who played their part to help deliver this memorable series! 🤜🤛 @BCCI pic.twitter.com/rk4cluCjEz
— Cricket Australia (@CricketAus) January 20, 2021
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. येत्या ४ फेब्रुवारीपासून भारत मायदेशात इंग्लंडविरुद्ध चार सामानायंची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची कालच घोषणा करण्यात आली असून २७ जानेवारीला चेन्नईत भारतीय संघ बायो बबल मध्ये प्रवेश करेल.
महत्वाच्या बातम्या:
ऑस्ट्रेलियाला त्याच्याच देशात सर्वाधिकवेळा पराभूत करणारे ३ भारतीय कर्णधार
हरभजन सिंगचा CSK सोबतचा प्रवास संपला, भावनिक ट्विट करत दिली माहिती