२०१८-१९ च्या देशांतर्गत क्रिकेट मोसमातील दुलीप ट्रॉफीसाठी बीसीसीआयने सोमवारी (23 जुलै) इंडिया रेड, इंडिया ग्रीन आणि इंडिया ब्लु संघांची निवड केली आहे.
मात्र या निवडीनंतर बीसीसीआयची निवड समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
यावेळी संघ निवड करताना निवड समितीने इंडियी रेड संघात डोपिंग चाचणीत दोषी ठरलेला पंजाबचा यष्टीरक्षक अभिषेक गुप्ताची निवड करुन वाद ओढावून घेतला आहे.
२०१७-१८ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी झालेल्या डोपिंग चाचणीत अभिषेक गुप्ता दोषी ठरला होता.
त्यामुळे बासीसीआयने गुप्तावर १५ जानेवारी २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यांच्या कालावधीसाठी बंदी घातली आहे.
असे असतानाही निवड समितीने अभिषेक गुप्ताची दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया रेड संघात निवड केल्याने मोठा वाद उभा राहीला होता.
त्यानंतर निवड समितीने सोमवारी (२३ जुलै) रात्री आपली चुक सुधारत अभिषेक गुप्ताच्या जागी अक्षय वाडकरला संधी दिली आहे.
बीसीसीआयच्या वेबसाईटवर मात्र अजूनही ह्या खेळाडूचे नाव इंडिया रेड संघात दिसत आहे.
२०१८-१९ ची दुलीप ट्रॉफी स्पर्धा १७ ऑगस्ट ते ७ सप्टेबर या दरम्यान खेळवली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावा अपेक्षा आहे, तुझा हरवलेला दात तुला पुन्हा मिळेल!
-संजय मांजरेकर, हर्षा भोगलेंना टक्कर द्यायला नवीन समालोचक…