---Advertisement---

‘या’ क्रिकेटपटूच्या घराला बसला अम्‍फान वादळाचा तडाखा

On: शुक्रवार, मे 22, 2020 10:45 AM
---Advertisement---

कोलकाता | संपूर्ण भारत देश कोरोना या महाभयानक विषाणूंशी लढत आहे तर दुसरीकडे अम्फान या वादळी वाऱ्याने भारतापुढे नवी समस्या उभी केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना या वादळाचा तडाखा जोरदार तडाखा बसला आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही या वादळाचा फटका बसला आहे.

सौरव गांगुली यांच्या घराच्या पाठीमागे एक भले मोठे आंब्याचे झाड आहे . या वादळी वाऱ्यामुळे हे झाड कोसळून पडले आहे. याची माहिती स्वतः सौरव गांगुलीवर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

ताशी 160 ते 180 किमीच्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळामुळे 10 ते 12 जण ठार झाल्याची माहिती आहे. कोलकाताच्या अनेक भागात पूर आला आहे. कोलकाता विमानतळावर या वादळाचा परिणाम दिसतोय. इथे सर्वत्र पाणी भरलेलं आहे.

गांगुलीला करा आयसीसीचे अध्यक्ष

याचदरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे अध्यक्ष ग्रॅम स्मिथ यांनी एक मोठे विधान केले आहे. स्मिथ म्हणाले की, कोरोना या व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर जागतिक क्रिकेटला पुन्हा उभे करण्यासाठी आयसीसीला एका भक्कम नेतृत्वाची गरज आहे. या पदावर सौरव गांगुली योग्य व्यक्ती असून त्यांच्याकडे आधुनिक क्रिकेटचे ज्ञान आहे. आपल्या नेतृत्वाद्वारे सौरव गांगुली जागतिक क्रिकेटला पुन्हा उभा करू शकतील.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांनी परत आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांचा कालावधी मेच्या अखेरपर्यंत समाप्त होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---