---Advertisement---

अॅडम गिलक्रिस्टचा विश्वविक्रम मोडत क्विंटन डी कॉकने रचला इतिहास

On: रविवार, जुलै 22, 2018 3:40 PM
---Advertisement---

कोलंबो | सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट मैदानावर शुक्रवारपासून (२० जुलै) श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

या सामन्यावर श्रीलंकेने मोठी पकड घेतली आहे. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने विश्वविक्रम केला आहे.

क्विंटन डी कॉकने सर्वात कमी ३५ कसोटी सामन्यात यष्टीमागे १५० बळी मिळवण्याची किमया केली आहे.

यापूर्वी सर्वात कमी ३६ सामन्यात यष्टीमागे १५० बळी मिळवण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलक्रिस्टच्या नावावर होता.

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात  लुंगी एंगीडीने गोलंदाजीवर क्विंटन डि कॉकने सलामीवीर दिमुथ करुणारत्नेचा झेल पकडत यष्टीमागे १५० बळी पूर्ण केले. यामध्ये १४१ झेल आणि ९ फलंदाजांना यष्टीचित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-या गोष्टीमुळे राहुल द्रविड झाला आनंदीत

-सर व्हिव रिचर्ड्स यांना मागे टाकत या पाकिस्तानी फलंदाजाने रचला विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment