आयपीएल मधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे सर्वाधिक चाहते आहेत. दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये मुंबई भारी की चेन्नई यावरुन सतत चर्चा आणि वाद होत असतात.
आता या चाहत्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही सामील झाला आहे. यामध्ये रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सच्या सर्वात मोठ्या चाहतीला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे.
ही चाहती दुसरी तिसरी कोणी नसुन एमएस धोनीची कन्या झीवा आहे.
रोहित शर्माने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये झीवा मुंबई इंडियन्सला चिअर करताना दिसत आहे.
We have a new @mipaltan fan in the house yo!! @msdhoni @SaakshiSRawat pic.twitter.com/yasd7p6gHj
— Rohit Sharma (@ImRo45) July 21, 2018
2018 च्या आयपीएल मध्ये गतविजेता मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती. तर चेन्नई सुपर किंग्सने दोन वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन करत विजेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो-यो टेस्ट!
-माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय…