कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढे आले आहेत. यामध्ये क्रिकेटपटूंचाही सहभाग आहे.
अशा संकटाच्या परिस्थितीत क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाकिस्तानचा कसोटी कर्णधार अझर अलीने (Azhar Ali) कोविड-१९ विरुद्धच्या लढाईसाठी सहाय्यता निधी जमविण्याच्या हेतूने आपल्या त्या बॅटचा लिलाव (Auction of Cricket accessories) करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या बॅटने त्याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्रिशतक ठोकले होते.
याबरोबरच अझर २०१७मधील चॅम्पियन्स ट्रॉफीत वापरलेल्या जर्सीचाही लिलाव करणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत पाकिस्तानने विजेतेपद मिळवले होते. अझरने आपल्या बॅट आणि जर्सीला अत्यंत जवळच्या वस्तूंपैकी २ वस्तू सांगत यांची मूळ किंमत १० लाख पाकिस्तानी रुपये ठेवली. या वस्तूंचा लिलाव ५ मेपर्यंत चालणार आहे.
३५ वर्षीय अझरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मी माझ्या जवळच्या २ वस्तूंचा लिलाव करत आहे. जेणेकरून या कठीण परिस्थितीचा सामना करत असलेल्या लोकांची मदत करता येईल. या वस्तूंची मूळ किंमत १० लाख पाकिस्तानी रुपये आहे.”
https://twitter.com/AzharAli_/status/1255016799583813632
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) या व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपली स्वाक्षरी असलेला शर्ट, बॅट आणि स्टम्पचा लिलाव केला होता. अँडरसनने या वस्तूंचा वापर केपटाऊनमध्ये खेळलेल्या मागील कसोटी सामन्यात केला होता.
अँडरसनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मी ईबेवर ‘गोवेलफंड’साठी लिलाव करत आहे. या लिलावात केपटाऊनमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यातील माझा शर्ट, स्टम्प आणि बॅटचा समावेश आहे.”
Just a couple of days left to bid on my signed shirt and stump 👇 and my bat. Raising money for the @gowellfund https://t.co/DcAdsYcQmJ pic.twitter.com/pZQnWtw0fg
— James Anderson (@jimmy9) April 29, 2020
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) आपल्या क्रिकेटच्या वस्तूंचा लिलाव केला होता. तसेच शुक्रवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्सनेही (AB De Villiers) लोकांच्या मदतीसाठी आपल्या क्रिकेटच्या वस्तूंचा लिलाव करण्याची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताच्या महान क्रिकेटपटूचा लाॅकडाऊन दरम्यान मृत्यु
-ज्या खेळाडूसाठी धोनी निवडसमितीशी भांडला, त्यानेच धोनीला…
-५ अशी कारणं ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार