---Advertisement---

गौतम गंभीर नंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचे धोनीविषयी मोठे वक्तव्य

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 6:31 AM
---Advertisement---

नुकतेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पराभूत झाला. या मालिकेत भारताची मधल्या फळीतील फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचे खापर पूर्णपणे एमएस धोनीवर फोडले आहे.

या मालिकेनंतर एमएस धोनीवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. आता यामध्ये भारतीय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि गौतम गंभीरनंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचीही भर पडली आहे.

“मला असे वाटत आहे की धोनी आता पहिल्यासारखा क्रिकेटपटू राहिला नाही. त्याच्या वयाचा खेळावर नक्की परीणाम झाला आहे. यापूर्वी धोनी फलंदाजी करताना जबाबदारी घेउन शेवटपर्यंत फलंदाजी करायचा. तसेच निर्धाव खेळलेल्या चेंडूची भरपाई देखिल करायचा मात्र गेले एक वर्ष असे होत नाही.” धोनीविषयी बोलताना सेहवाग असा म्हणाला.

तसेच इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यतील भारताच्या पराभवाला सेहवागने सर्वच फलंदाजांना जबाबदार धरले. भारतीय संघाने आणखी ३० ते ४० धावा जास्त केल्या असत्या तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

महत्त्वाच्या बातम्या-

अॅडम गिलक्रिस्ट म्हणतो हा फिरकीपटू मला घाम फोडायचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment