पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात शुक्रवार (20जुलै) क्विन्स स्पोर्ट्स क्लब बुलावायो येथे पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना पार पडला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 1 बाद 399 धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर फखर जमानने विक्रमी नाबाद 210 धावा केल्या तर इमाम उल हकने 113 धावा करत शतक झळकावले.
पाकिस्तानच्या या विशाल 399 धावसंख्येच्या लक्षाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे सर्वबाद 155 धावाच करु शकला.
पाकिस्तानने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत या विजयाबरोबर 4-0 ने आघाडी घेतली.
पाकिस्तान-झिंम्बाब्वे यांच्यातील चौथ्या सामन्यात झाले हे खास विक्रम:
– एकदिवसीय क्रिकेटमध्ये फखर जमान आणि इमाम उल हकने सलामीसाठी सर्वोच्च (304) धावांची भागिदारी केली.
– पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा फखर जमान (210*) ठरला पहिला फलंदाज.
– फखर जमान ठरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी (17) डावात द्विशतक करणारा फलंदाज.
– पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सर्वात जास्त (29) चौकार मारणारा फखर जमान पहिला फलंदाज.
– 399 ही पाकिस्तान संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या ठरली.
– द्विपक्षिय एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानी सलामीवीरांनी प्रथमच केली चार शतके.
महत्त्वाच्या बातम्या-
-म्हणून सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट अकादमी
-अनिल कुंबळेचा विक्रम थोडक्यात वाचला, दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने एका डावात बाद केले 9 फलंदाज