---Advertisement---

Hero No. 1 । विराटच्या गळ्यात पडला आणि रातोरात स्टार बनला! चाहत्याचा गावकऱ्यांकडून सन्मान

Virat Kohli
---Advertisement---

Ind vs Afg 2nd T20I : विराट कोहली फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक
म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याची एक झलक मिळवण्यासाठीही त्याचे चाहते काहीही करायला तयार असतात. बऱ्याचदा ते आपल्या आवडत्या खेळाडूला जवळून पाहण्यासाठी चक्क मैदानातही घूसल्याचे आपण पाहिले आहे.

नुकत्याच इंदोरला झालेल्या भारत विरूद्ध अफगाणिस्तान(India vs Afghanistan) सामन्यातही पून्हा एकदा असेच घडलेले आपणास दिसले. दूसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान विराट(Virat Kohli) सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याच दरम्यान एका फॅनने मैदानात घुसत चक्क विराटच्या दिशेने धाव घेतली. तो येऊन कोहलीच्या पाया तर पडलाच, त्याला मिठीही मारली. मात्र या गोड प्रसंगानंतर लगेच त्याला त्याच्या शिक्षाही मिळाली. सिक्युरीटी गार्ड्सने त्याला मैदानाबाहेर नेले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

(Virat Kohli fan, who breached security to hug cricketer, felicitated by friends)

गावात झालंय जंगी स्वागत
पोलिसांनी विराटप्रेमीला चौकशी नंतर सोडले. मात्र आता चर्चा झालीय ती त्याच्याच आणखी एका व्हिडीयोची. व्हिडीयोमध्ये त्याचे मित्र आणि गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केल्याचे दिसून येत आहे. त्याच्यावर फूलांचा वर्षाव होत असून, हार घालत त्याचे स्वागत झालेले दिसून येत आहे.

कमबॅक करतोय विराट
विराट या मालिकेतून टी-20 क्रिकेट मध्ये आपले पुनरागमन करत आहे. दूसऱ्या टी-20 सामन्यात त्याने उत्कृष्ठ फलंदाजी केली होती. त्याने केवळ 16 चेंडूत 29 धावा केल्या. यात 5 चौकारांचाही समावेश होता. विराट आयपीएलमध्ये बरेच वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार राहिला आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बेंगलोरमध्ये खेळला गेला. पण एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कारकिर्दीत बराच वेळ घावलेला विराट अक्षरशः शुन्यावर बाद झाला. भारतीय संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या.

वाचा आणखी बातम्या –
India vs Afghanistan : विश्वचषकापूर्वी शेवटची संधी, संघात होऊ शकतात मोठ्ठे बदल; विराट-रोहितचं काय होणार?
NZ vs PAK । बाबर आझममुळे चाहता जमीनधोस्त! षटकारासाठी मारलेला चेंडू खांद्याला लागला आणि…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---