दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन सततच्या दुखापतींमुळे गेल्या तीन वर्षांपासून संघातून आत-बाहेर होत आहे.
दक्षिण अफ्रिकेचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या स्टेनला त्याच्या कसोटी कारकिर्दीत ५०० बळी मिळवण्याचे वेध लागले आहे.
सध्या दक्षिण अफ्रिकेकडून कसोटीमध्ये शॉन पोलाक ४२१ बळी घेत अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी ४१९ बळींसह डेल स्टेन आहे.
जानेवारीमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत जखमी झालेला स्टेन आता तंदुरुस्त होऊन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
दक्षिण अफ्रिकेकडून कसोटीमध्ये शॉन पोलाकचा ४२१ बळींचा विक्रम मोडण्यासाठी ४१९ बळी नावावर असलेल्या स्टेनला फक्त तीन बळींची गरज आहे. मात्र स्टेनचे लक्ष शॉन पोलाकचा विक्रम मोडणे नाही.
त्याला दक्षिण अफ्रिकेसाठी १०० कसोटी सामने खेळून त्यामध्ये ५०० बळी मिळवायचे आहेत.
गेल्य सहा महिन्यापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या स्टेनने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेतून शानदार पुनरामन केले आहे.
हॅम्पशायर संघाकडून प्रथम श्रेणी सामन्यात यॉर्कशायर विरुद्ध पहिल्या डावात पाच बळी मिळवून श्रीलंका दौऱ्यासाठी तो तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
अशी आहे डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द-
कोसोटी क्रिकेट – ८६ सामने ४१९ बळी
एकदिवसीय क्रिकेट – ११६ सामने १८० बळी
टी-२० क्रिकेट- ४२ सामने ५८ बळी
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात
-जगाला मिळणार दुसरा शेन वार्न, वय आहे फक्त ७ वर्षे