---Advertisement---

क्रिकेट जगतातून सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली; विराट,सचिनसह या क्रिकेटपटूंचे भावनिक ट्विट

On: सोमवार, जून 15, 2020 1:49 PM
---Advertisement---

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने काल(14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे वृत्त आले. हे वृत्त आल्यानंतर सिनेसृष्टीसह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्याच्या अचानक जाण्याने क्रिकेट क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

विराट कोहली, युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, अशा अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

सुशांतने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका निभावली होती. त्यामुळे तो क्रिकेट चाहत्यांच्या जवळ पोहचला होता.

त्याच्या निधनानंतर युवराजने ट्विट केले की ‘विश्वास बसत नाही, इतका युवा आणि यशस्वी असूनही? खरंच आपल्याला माहीत नसते की व्यक्तीच्या आत काय सुरु आहे. बाहेरुन सर्व काही वेगळे दिसते.’

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1272107154816679936

तसेच सचिन तेंडुलकर सुशांतला श्रद्धांजली वाहताना ट्विट केले की ‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यामुळे धक्का बसला आणि वाईट वाटले. तो युवा आणि प्रतिभाशाली अभिनेता होता. त्याच्या कुटुंब आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.’

भारताचा कर्णधार विराटने ट्विट करत म्हटले आहे की ‘सुशांत सिंग राजपूत बद्दल ऐकून धक्का बसला. हे पचवणे खूप कठिण आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. देव त्याच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला दु:ख सहन करण्याची ताकद देवो.’

या व्यतिरिक्त अन्यही अनेक क्रिकेटपटूंनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

सुशांतने एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाव्यतिरिक्त काय पो छे, केदारनाथ, राब्ता, पीके, छिछोरे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्याची पवित्र रिश्ता ही दैनंदीन मालिकाही बरिच गाजली होती.

ट्रेंडिंग घडामोडी – 

धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच हातात काठी घेऊन…

फक्त ‘एमएस धोनी’ चित्रपटच नाही, सुशांतने केले क्रिकेटवर आधारीत आणखी एका चित्रपटात काम

सुशांतची ‘ती’ कृती पाहून धोनीही झाला होता अवाक्, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---