क्रिकेट असो किंवा अजून कुठलाही खेळ असो त्यामध्ये खेळाडूला त्या खेळाच्या आवारात राहून आपल्या संघा साठी प्रतिनिधित्व करावे लागते. त्या खेळाचे जे नियम असतील त्या नियमांचे उल्लंघन करून चालत नाही. असे काही खेळाडू झाले ज्यांनी संघाचे आणि त्या खेळाचे नियम मोडले. असाच एक केनिया संघाचा प्रसिद्ध खेळाडू मोरीस ओडुम्बे. केनियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू त्या वेळेस सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासारख्या खेळाडूंच्या पंगतीत त्याने आपले स्थान जमवले होते. आज त्याचा वाढदिवस असून आज तो ५२ वर्षाचा झाला आहे. या लेखातून आपण त्याच्याच विषयी जाणून घेऊया.
मोरीस ओडुम्बेवर लागली ५ वर्षाची बंदी
केनिया संघाचा हा दिग्गज खेळाडू मोरीस ओडुम्बे. २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ने मोरीस ओडुम्बेच्या घरावर छापा टाकला. मोरीस ओडुम्बेचा ‘बुकी’ लोकांशी संपर्क असल्याचे सिद्ध झाले. आणि त्याचावर ५ वर्षाची बंदी घालण्यात आली. आणि त्यामुळेच प्रसिद्ध खेळाडू मोरीस ओडुम्बेने लोकांच्या संपर्कात येणे बंद केले. या प्रकरणानंतर मोरीस ओडुम्बेचे आयुष्य विखुरले गेले.
एका मुलाखती दरम्यान मोरीस ओडुम्बेने सागितले की, “माझ्याकडे जेवायला सुद्धा पैसे नव्हते. मी कित्येक रात्र उपाशी पोटी रस्त्यावर काढल्या आहेत. त्यामुळे मी ड्रग्स सुद्धा घायला सुरुवात केली.” मोरीस ओडुम्बेचे म्हणणे आहे की, “आज जी काही परिस्थिती झाली ती केवळ माझ्या पत्नीमुळे. तिने आयसीसीला चुकीची माहिती माहिती दिली आणि माझ्यावर कारवाई झाली.”
केनियाचे बातमीपत्र ‘दि स्टेनडर्ड’ला मुलाखत देताना मोरीस ओडुम्बेने सांगितला की, “माझ्या पत्नीसोबत शोधकार्त्यानी संपर्क साधला होता. आणि मला माहिती नाही की त्यांनी माझ्या पत्नीला कसली तरी आश्वासनं दिली. तिने जे काही शोधकार्त्यानी सांगितले ते त्यांनी मान्य करून घेतले.” मोरीस ओडुम्बे पुढे सांगतो की, “परिस्थिती एकदम बिघडून गेली होती. मी ड्रग्सच्या आहारी गेलो. पुनर्वसनाला जाण्याची सुद्धा माझ्यावर वेळ आली.” दरम्यान, मोरीस ओडुम्बेने हार मानली नाही. ५ वर्षांच्या बंदीनंतर सुद्धा त्यांनी आपला मार्ग क्रिकेटकडे वळवला. चाळीसाव्या वर्षामध्ये त्यांनी केनियाच्या देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये क्रिकेट खेळले. २०१८ साली त्यांना केनिया संघाच प्रशिक्षकपद देण्यात आला. परंतु, ते ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही.
मोरीस ओडुम्बेची क्रिकेटची कारकीर्द
मोरीस ओडुम्बे हा त्या वेळेसचा केनिया संघाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू होता. तो एक मोठ्या सामन्याचा खेळाडू होता. मोरीस ओडुम्बे मधल्या फळीत फलंदाजीला येऊन ऑफ स्पिन गोलंदाजी सुद्धा करत असे. मोरीस ओडुम्बेच्या कर्णधारपदाखाली १९९६च्या विश्वचषकात केनिया संघाने तगड्या वेस्ट इंडीज संघाला हरवून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. केनियाने ७३ धावांच्या मोठ्या फरकाने वेस्टइंडीज संघाला हरवले होते. त्या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे मोरीस ओडुम्बे. त्याने या सामन्यात केवळ १४ धावा देऊन ३ गडी बाद केले होते. सोबतच त्याने एक धावचीत सुद्धा केले.
२००३ च्या विश्वचषकात संघाला दिली चांगली साथ
साल २००३च्या विश्वचषकात केनिया संघ चांगलाच फॉर्ममध्ये होता. केनिया सारख्या कमकुवत संघाने त्यावेळेस उपांत्यफेरी गाठली होती. २००३च्या विश्वचषकात मोरीस ओडुम्बेने ४२च्या सरासरीने धावा केल्या आणि ९ गडी सुद्धा बाद केले.