---Advertisement---

केएल राहुलला भारतीय संघातील या खेळाडूची वाटते भीती

On: मंगळवार, जून 19, 2018 9:48 AM
---Advertisement---

के.एल राहुल या नावाची ओळख भारतीय क्रिकेटला 2015 साली झाली. पण हे नाव भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मनावर 2018 च्या आयपीएल दरम्यान कोरले गेले.

2018 च्या आयपीएलमध्ये धमकेदार कामगिरी करत के.एल राहुलने आपल्या चाहत्यांच्या संख्येत लाखोंनी भर घातली.

2015 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या राहुलने आजपर्यंत भारतासाठी जेव्हा संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी केली आहे. मात्र शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशी आघाडीच्या फळीत त्याला मात्र आपले स्थान पक्के करता आले नाही.

त्याच्या बाबतीत मर्यादित षटकांच्या सामन्यातही हेच होतय. अलिकडील काळात बहरात असलेल्या भारतीय फलंदाजांच्या कामगिरीमुळे त्याला आपले संघातील स्थान पक्के करता आले नाही.

असे असले तरी 15 सदस्सीय भारतीय संघात मात्र तो असतो.

सोमवार दि. 18 जूनला ‘व्हाट द डक’ या प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमात  विक्रम साठ्ये यांनी के.एल राहुल आणि आर.अश्विन यांची मुलाखत घेतली.

या कार्यक्रमात राहुल आणि आर.अश्विन यांनी क्रिकेटबरोबर त्यांच्या वैयक्तीक जीवनातीलही अनेक जुन्या आठवनींनी उजाळा दिला.

यामध्ये राहुलने भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्डयाच्या स्वभावाचा एक पैलू सांगितला.

“मला हार्दिक बरोबर बाहेर फिरण्याची भीती वाटते. हार्दिकला कुठे काय बोलायचे याचे भान नसते. तो कोणताही विचार न करता मनात येईल ते बालून जातो.” असे के.एल राहुल म्हणाला.

“मी, हार्दिक आणि दिनेश कार्तिक दक्षिण अफ्रिकेत एका सामन्याच्या आदल्या रात्री फिरायला गेलो होतो. हे बाकी कोणाला माहित नव्हते. दुसऱ्या दिवशी हार्दिक विराट समोर सगळे सांगत बसला. आम्ही हे केले, आम्ही ते केले. त्यामुळे मला त्याच्याशी बाहेर जाताना भीती वाटते.” असे राहुल विक्रम साठ्ये यांच्याशी बोलताना म्हणाला.

2018 च्या आपीएल मधील कामगिरीने राहुलने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या-

तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!

स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment