तिरंगी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय ‘अ’ संघाने ईसीबी इल्हेवन संघाचा सराव सामन्यात पराभव करत आपल्या दौऱ्याची दमदार सुरूवात केली आहे.
ही तिरंगी मालिका भारत ‘अ’, विंडीज ‘अ’ आणि इंग्लंड लायन्स या संघामध्ये दि. 22 जूनपासून सुरूवात होत आहे.
ही मालिका सुरू होण्यापूर्वी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय ‘अ’ संघाने ईसीबी इल्हेवन संघाचा 125 धावांनी पराभव केला.
रविवार दि.17 जून रोजी झालेल्या या सामन्यात भारतीय ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करतान पृश्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 328 धावांचा डोंगर उभा केला.
भारतीय संघाला पृथ्वी शॉने धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्याने 61 बॉलमध्ये 70 धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यर 54 आणि इशान किशन 50 यांनी भारताचा डाव पुढे नेला.
ईसीबी इल्हेवनकडून रेयान हिगिंन्सने 10 षटकात 50 धावांच्या मोबदल्यात 4 बळी मिळवले.
328 धावांचा सामना करण्यासाठी उतरलेला ईसीबी इल्हेवन 36.5 षटकात 203 धावंवर सर्वबाद झाला.
महत्वाच्या बातम्या-
–दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया…
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात