भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मोठ्या वादात सापडली आहे.
2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतची तीच्या या कामगिरीसाठी पंजाब सरकारने पोलिस उपअधिक्षक पदी निवड केली होती.
मात्र उपअधिक्षक पदासाठी पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतच्या पदवी प्रमाणपत्राची पाडताळणी करताना हरमनप्रीतने पंजाब पोलिसांसमोर बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे.
हरमनप्रीतने उपअधिक्षक पदासाठी मेरठच्या चौधरी चरनसिंह विद्यापीठतून बीए केल्याचे प्रमाणपत्र जाहीर केले होते.
पंजाब संघातील हरमनप्रीतची संघ सहकारी असलेल्या एका क्रिकेटपटूने नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबत मोठा खुलासा केला आहे.
“मी जे काही ऐकले आहे ते धक्कादायक आहे. माझ्या माहितीप्रमाणे हरमनप्रीतने तीचे पदवीचे शिक्षण जालंधरच्या हंस राज महिला महाविद्यालयातून केले आहे.” हरमनप्रीतची पंजाब संघातील सहकारी असलेल्या या क्रिकेटपटूने हा खुलासा केला.
याप्रकरणामुळे हरमनप्रीत कौरला तीचे उपअधिक्षक पद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
2017 साली हरमनप्रीतला तीच्या क्रिकेटमधील योगदानासाठी भारत सरकारने अर्जून पुरस्काराने सन्मानित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-जगाला मिळणार दुसरा शेन वार्न, वय आहे फक्त ७ वर्षे
-कुलदीप यादवला कमी लेखणे महागात पडले, या खेळाडूने मान्य केली चूक