भारताचे महान माजी क्रिकेटकपटू मोहिंदर अमरनाथ यांनी युवा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचे खास शब्दात कौतूक केले आहे.
कुलदीप यादवने इंग्लंविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. कुलदीपने मंगळवार, ३ जुलैला झालेल्या सामन्यात इंग्लंडचे २४ धावात पाच गडी बाद करत निम्मा संघ स्वस्तात तंबूत धाडला होता.
या कामगिरीबद्दल एका लेखात १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी कुलदीप आणि भारतीय संघाचे कौतूक केले.
“कुलदीपच्या कामगिरीने मला काहीच आश्चर्य वाटले नाही कारण मला कुलदीप इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल याचा विश्वास होता. कुलदीप प्रत्येकवेळी गोलंदाजी करताना बळी मिळवण्याचा प्रयत्न करतो याबद्दल मला त्याचे फार कौतूक वाटते. त्याच्याकडे गोलंदाजीचे चांगले संतुलन.” अमरनाथ कुलदीप यादवचे कौतूक करताना म्हणाले.
“टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ सर्वोत्कृष्ट आहे. इंग्लंड दौऱ्याची सुरवात विजयाने झाल्याने खेळडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.” मोहिंदर अमरनाथ त्यांच्या लेखात असे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-स्पीडगन डेल स्टेनचे हे आहे क्रिकेट जगतातील सर्वात मोठे स्वप्न
-आणि काल कसोटीत ४४ वर्षातील सर्वात निचांकी धावसंख्येची झाली…