---Advertisement---

श्रीलंकेचा धुव्वा उडवत 19 वर्षाखालील भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत विजय

---Advertisement---

19 वर्षाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 244 धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 589 धावा करत 345 धावांची आघाडी घेतली होती . भारताकडून अथर्व तायडे आणि आयुष बडोणी यांनी अनुक्रमे 113 आणि 185 धावा करत शतके साजरे केले होते. तर कर्णधार अनुज रावतनेही 63 धावांचे योगदान दिले होते.

श्रीलंकेला दुसऱ्या डावत भारताने 324 धावात रोखले. यामध्ये श्रीलंकेकडून निशान मदुश्काने 104 धावांचे योगदान दिले. तर नवेंदु फर्नांडोने 78 धावा केल्या.

भारताकडून मोहित जांग्राने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

त्यानंतर भारताने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर, श्रीलंकेवर 21 धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

-वनडेत द्विशतक करणारा हा ठरला पहिलाच पाकिस्तानी फलंदाज   

पाकिस्तानी सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी, 18 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment