सध्या वेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेट प्रकारांवरून आपापली मते मांडत असतात. अशातच आता भारताला पहिला वर्ल्डकप जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनीही आपले मत मांडले आहे. त्यांनी या विशयात थेट आयसीसीकडे विनंती केली आहे. कपिल देव यांनी आयसीसीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाचवण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे.
माजी कर्णधार म्हणाला की, “फुटबॉलच्या वाटेवर क्रिकेटची सुरुवात झाली आहे. टी-20 लीगच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने वनडे आणि कसोटी सामने वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा.” शिवाय, “फुटबॉलमधील फिफा विश्वचषक चार वर्षांनी होतो. फुटबॉल देश असे एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. तसेच सध्या क्रिकेटमध्ये खेळाडूंचे लक्ष त्यांच्या क्लबवर असते आणि ते फक्त विश्वचषक खेळतात.” याबाबत कपिल देव यांनी चिंता व्यक्त केली आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर लवकरच बनणार डॅडी, पत्नीचे बेबी बंपसोबतचे फोटो केलेत शेअर
विराटने विश्वास दाखवलेला शाहबाज टीम इंडियात; तीन वर्षाच्या मेहनतीचे मिळाले फळ