मंगळवार, 3 जुलैला झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला.
भारताच्या या विजयाचेे शिल्पकार ठरले ते चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि फलंदाज केएल राहुल.
या सामन्यात टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत कुलदीपने 4 षटकात 24 धावा देत पाच बळी मिळवले.
कुलदीपच्या या कामगिरीने इंग्लंडच्या फंलंदाजीचे कंबरडे मोडत भारताने इंग्लंडला 20 षटकात 159 धावांवर रोखले.
तर फलंदाजीत आयपीएलचा स्टार केएल राहुलने पुन्हा एकदा फटकेबाजी करत नाबाद शतक झळकावले. भारतीय संघाने राहुलच्या शतकाच्या जोरावर 2 गड्यांच्या मोबदल्या 18.2 षटकात हा सामना सहज जिंकला.
या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयाॅन मॉर्गनने कुलदीप आणि राहुलचे कौतूक कले. तसेच त्याने कुलदीप यादवला गांभीर्याने न घेतल्याचा त्यांना मोठा फटका बसल्याचे देखील मान्य केले.
“कुलदीपने आज सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने आमच्यावर वर्चस्व गाजवत आम्हाला अक्षरश: फसवून त्याच्या जाळ्यात अडकवले. मला मान्य आहे की आमचा संघ फिरकी गोलंदाजी विरोधात खेळताना अडखळतो. पुढील सामन्यात फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करणार आहोत. ” मॉर्गन पत्रकार परीषदेत बोलताना म्हणाला.
या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परीषदेत मॉर्गनने चहल- कुलदीप यादव यांच्याबाबत बोलताना त्यांना दुर्लक्ष करत ते एक किवा दोन खेळाडूंसाठी नाही तर संपूर्ण विरोधी संघासाठी योजना आखतो असे म्हणाला होता.
या सामन्यात मात्र कुलदीपने अपेक्षितपणे चांगली गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीवर नाचवले.
ज्या पिचवर इंग्लंडच्या फलंदाजी भुई सपाट झाली त्याच पिचवर भारताच्या केएल राहुलने नाबाद शतक करत विजयाची गुढी उभारली.
“केएल राहुलने आज सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. मला वाटते की राहुल सोडून आज कोणालाच चांगली फलंदाजी करता आली नाही.” केएल राहुलच्या फलंदाजीचे कौतूक करताना मॉर्गन म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारत विरुद्ध इंग्लंड टी२०सामन्यातील या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
-केएल राहुलमुळे रोहित शर्माचा मोठा विक्रम धोक्यात!