---Advertisement---

चाहत्यांनी सांगितले म्हणून केस कापलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा पहा नवा लुक

On: सोमवार, मे 25, 2020 5:19 PM
---Advertisement---

मुंबई । लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरात नजरकैदेत बंद आहेत. हे क्रिकेटपटू घरीच राहून फॅन्सबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. काही क्रिकेटपटूच टिक टॉक वर व्हिडिओ बनवत आहेत तर काही जण जेवण बनवण्यात व्यस्त आहेत.

या लॉकडाऊनमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा हेअरकटच्या ट्रेंड दाखवत आहेत. नुकतेच सचिन तेंडुलकरने त्याच्या मुलाचा हेअरकट केला होता. अनुष्का शर्मा हीदेखील विराटची कटिंग करताना दिसून आली. दुसरीकडे केएल राहुल मात्र स्वतःचाच हेअरकट स्वत: करून टाकला आहे.

काही दिवसांपूर्वी केएल राहुलने इन्स्टाग्रामवर त्याचा हा फोटो फॅन्सबरोबर शेअर केला होता आणि हा हेअरकट आवडला की नाही असे देखील त्याने फॅन्सला विचारले आहे. त्यावर क्रिकेट फॅन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. राहुलचा हा नवा लूक क्रिकेट फॅन्सला खूप पसंद पडत आहे. फोटोसोबत कॅप्शन देताना राहुलने लिहिले की, ‘डोके गेले आणि केसही गेले’.

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहेत. आयपीएल स्पर्धा सुरू असल्या असत्या तर राहुल पंजाबच्या संघाकडून खेळताना दिसला असता. राहुल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर तो नेहमी लाईव्ह येऊन क्रिकेट चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. सध्या तो लॉकडाऊनच्या काळात आपल्या मित्रांसोबत ऑनलाइन लुडो गेम खेळून दिवस काढतोय.

राहुल सतत नविनविन ऑनलाईन खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो. पुजारा व तो बऱ्याच वेळा हे खेळ खेळत असतो. पाठीमागे त्याने पब्जी खेळ सोडल्याचेही वृत्त होते. अनेक भारतीय सध्या लुडो किंवा तत्सम खेळ घरी खेळत आहेत व त्यात आता क्रिकेटपटूही मागे नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---