आज (२३ जून) बऱ्याच दिवसांनंतर क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठा दिवस असेल. आज जगभरात विविध ठिकाणी विविध क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील. आज आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित स्पर्धा म्हणजे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम दिवस सुद्धा आहे. दोन वर्षांपासून चालत आलेल्या या स्पर्धेचा आज निकाल लागू शकतो. तसेच इतर ठिकाणी सुद्धा सामने पार पडणार आहेत. चला तर मग मंडळी, आजच्या सगळ्या सामन्यांचा आढावा आणि वेळापत्रक माहिती करून घेऊया या बातमीच्या माध्यमातून…
पहिले तर, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी लढत पाहायला मिळत आहे. इतके दिवस पावसामुळे वैतागलेल्या चाहत्यांना कालच्या दिवशी सामन्याचा आनंद लुटता आला. आज कदाचित पावसाचे व्यत्यय नसल्यास विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.
इंग्लंडविरुद्ध श्रीलंका टी-२० मालिका
श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून आजपासून इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला सुरुवात होईल. श्रीलंकेचा संघ इंग्लंड विरुद्ध ३ टी-२० सामन्याची मालिका खेळेल. या मालिकेचा पहिला सामना कार्डिफ येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना ठीक रात्री ११ वाजता सुरु होईल.
टी-२० ब्लास्टमध्ये तीन सामने
इंग्लंडमध्ये चालू असलेल्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत आज ३ सामने खेळले जातील. उत्तर गटात यॉर्कशायर आणि वूस्टरशायर यांचा सामना होईल. डरहेम विरुद्ध नॉर्थम्टनशायर यांच्यात सुद्धा सामना रंगेल आणि सर्रे विरुद्ध समरसेट यांचा सामना होईल. हे सामने रात्री ११ वाजता सुरू होणार असून तीन वेगवेगळ्या मैदानावर रंगणार आहेत.
ढाका प्रीमिअर लीगमध्ये ४ सामने
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या ढाका प्रीमिअर लीगमध्ये आज चार सामने होतील. स्पोर्टिंग क्लब-शेख जमाल धनमोंडी क्लब यांच्यात पहिला सामना होईल. लीजेंड्स ऑफ रूपगंज आणि पार्टेक्स स्पोर्टिंग क्लब यांच्यात दुसरा सामना होईल. तर, प्राइम क्रिकेट बैंक आणि गाजी ग्रुप क्रिकेटर्स, अबहानी लिमिटेड आणि प्राइम डोलेश्वर स्पोर्टिंग क्लब यांच्यात अनुक्रमे तिसरा आणि चौथा सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार कोहलीच्या चाणाक्ष रणनितीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण, समालोचकांनी तोंडभरुन केली स्तुती
काय भावा, पुजारा बनायचं आहे का?, सुपरस्लो फलंदाजीमुळे केन विलियम्सन झाला ट्रोल
‘बस्स, आता ब्रेकअप’! किवी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गिल सपशेल फ्लॉप अन् सारा झाली ट्रोल