---Advertisement---

IND vs AFG: रोहितच्या नावावर मोठा विश्वविक्रम;असा कारणामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका झाली. भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 आघाडी मिळवली होती. यातील तिसरा सामना बेंगलोर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (17 जानेवारी) पार पडला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पहिल्या काही षटकांत हा निर्णय चुकीचा ठरला असे दिसत होते. कारण, भारताने अवघ्या 22 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या.

दरम्यान, भारतीय संघातील यशस्वी जयस्वाल()yashasvi jaiswal, शिवम दुबे(shivam dube), संजू सॅमसंग(sanju samson) आणि विराट कोहली(virat kohli) यातील कोणत्याही खेळाडूंना दोन अंकी  धावसंख्या करता आली नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिंकु सिंग याने कर्णधार रोहित शर्माला(Rohit sharma) साथ दिली. या दोघांनी 190 धावांची भागिदारी केली. यामध्ये रोहितने आपल्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय सांमन्यांमध्ये सर्वाधिक 5 शतक ठोकण्याचा विक्रमही केला. अनुभवी आणि उजव्या हाताचा फलंदाज रोहितने 69 चेंडूत 121 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार आणि 8 षटकार लावले. तसेच रिंकूने 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 39 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. भारताने रोहित आणि रिंकू यांनी केलेल्या भागिदारीमुळे 212 धावां पर्यंत मजल मारली. भारतीय संघाने सुपर ओवरमध्ये हा सामना जिंकला. रोहितच्या या तुफानी खेळीबद्दल एक्स (X) वर कौतुकाचा वर्षाव पडत आहे.

( 2024मध्ये रोहित शर्मा पहिला शतक लावणारा भारतीय खेळाडू)

(रोहित शर्माचे टी20मध्ये 5वे शतक)

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG: ‘आता स्पर्धेत कोणीच नाही…’ रोहितने कर्णधारपदाचा रोवला झेंडा, कॅप्टन कूलचा विक्रम काढला मोडीत
IND vs AFG । चिन्नास्वामीवर हिटमॅन शो! ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---