आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंड आणि द्वितीय स्थानी असलेल्या भारतीय संघात आज नॉटींगहम येथिल टेंटब्रीज क्रिकेट मैदानावर या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.
भारताच्या या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने इंग्लंडला २-१ असे पराभूत करत टी-२० मालिका आपल्या नावे केली आहे.
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ विजय प्राप्त करुन इंग्लंडवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल.
तर यजमान इंग्लंड टी-२० मालिकेतील पराभव विसरुन भारताला नव्याने सामोरे जाण्यास सज्ज असेल.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील आजपर्यंतच्या एकदिवसीय मालिकेबाबतच्या काही खास गोष्टी-
१. भारतीय संघाने १९७४ ते २०१७ या काळात इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ९६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२ विजय मिळवले आहेत तर ३२ पराभव पाहिले आहेत.
२.आजपर्यंत भारतीय संघाला इंग्लंडमध्ये १९८६, १९९० आणि २०१४ साली फक्त तीन एकदिवसीय मालिका जिंकता आल्या आहेत.
३. भारताने इंग्लंडमध्ये प्रथम १९८६ साली अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका जिकंली.
४. १९९० साली भारताने मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा इंग्लंडच्या भूमिवर एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. मोहम्मद अझरुद्दीनचा कर्णधार म्हणुन पहिलाच मालिका विजय होता.
५. १९९० नंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकायला तब्बल २४ वर्ष लागली. २०१४ साली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल