आयपीयलमध्ये चमकदार कामगिरी केलेला भारतीय स्पीडस्टार उमेश यादव आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारीला लागला आहे.
भारताचा अनुभवी माजी गोलंदाज अशिष नेहराच्या सल्यानुसार मी आता सिंगल स्टंपवर माझ्या गोलंदाजीचा सराव करत असल्याचे उमेशने सांगितले.
आयपीयलमध्ये उमेश बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सचे प्रतिनिधीत्व करतोय. आशिश नेहरा याच संघांच्या गोलंदाजीचा प्रशिक्षक आहेत.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उमेश म्हणाला, “मला आयपीयलवेळी आशिष पाजींच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. गेले दिड महिने मी त्यांच्याबरोबर होतो त्यावेळी त्यांनी मला चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून मला गोलंदाजीतले अनेक बारकावे शिकता आले.”
ऑऊटस्विंग स्पेशलिस्ट असलेला ऊमेश म्हणाला की अॉऊटस्विंग बॉल माझ्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. मी आता इनस्विंग गोलंदाजीही करू लागलोे आहे. पण मी त्याचा वापर सरप्राईज म्हणून करणार आहे.
तो पुढे म्हणाला, “पीच कोणतेही असले तरी नव्या बॉलेने टप्पा एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर. जर वेगवेगळे प्रयोग करत बसला तर गडबड होण्याची शक्यता असते.” असे मला अशिष पाजींनी सांगितले.
2018 आयपीयल मोसमात ऊमेश यादवने 14 सामन्यात 20 बळी मिळवले आहेत.
उमेशने आजपर्यंत खेळलेल्या 36 कसोटी सामन्यात 99 बळी तर 71 एकदिवसीय सामन्यात 102 बळी मिळवले आहेत. उमेश भारताकडून फक्त एकच टी-20 सामना खेळला आहे त्यामधे त्याने एक बळी घेतला आहे.
सातत्याने 140 कि.मी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या ऊमेशला भारताच्या इंग्लंड दौऱ्यात महत्वाची भुमिका निभावावी लागणार आहे.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण