पाकिस्तानचा 7 वर्षीय लेग स्पिनर कालपासून सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.
इली मिकाल खान असे या पाकिस्तानच्या छोट्या लेग स्पिनरचे नाव आहे.
इली मिकाल खानची लेग स्पिन गोलंदाजी पाहुन लेग स्पिनचा बादशाह स्वता शेन वार्नने इलीचे कौतूक केले आहे.
लॉरेस स्पोर्ट्स अॅकॅडमीने मंगळवार, 3 जुलैला ट्विटरवरून इली मिकाल खानचा व्हीडीओ शेअर केला. याला शेन वार्नने रिट्विट करत इलीच्या लेग स्पिनच्या कौशल्याचे कौतूक केले. तसेच लॉरेस स्पोर्टिंग मुव्हमेंट ऑफ मंथसाठी इलीला मतदान करण्याचे अवाहन देखिल केले.
This was such a special moment for me and young Eli. He is such a wonderful young boy – please give the little guy your vote as he deserves it! Keep up the great work buddy ! Thankyou for your vote followers #LaureusSportingMoment “ https://t.co/xFwgpddp6n
— Shane Warne (@ShaneWarne) July 2, 2018
“माझ्यासाठी आणि इलीसाठी हा खास क्षण आहे. हा इली खुपच सुंदर आहे. किप इट अप इली.” अशाप्रकारे शेन वार्नने इली मिकाल खानला शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर शेन वार्नने मंगळवार, 3 जुलैला स्काइपवरून इलीशी बोलून त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी शेन वार्नशी संवाद साधताना इलीच्या डोळ्यातून आनंदाश्रु आले. तसेच इलीलने वार्नला तो इलीचा आदर्श आहे आणि इथले लोक मला छोटा शेन वार्न म्हणतात असे सांगितले. त्याचबरोबर इली मिकाल खानने त्याची पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची इच्छाही बोलून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादव काही ऐकेना! केला असा कारनामा की इंग्लंडचे फलंदाज फक्त पहात राहिले
-अखेर कर्णधार-उपकर्णधाराच्या रेसमध्ये विराटचा रोहितवर विजय