क्रिकेटमध्ये बॉल टेंम्परीग हे काही जुने नाही. कित्येत वर्षांपासून हे कृत्य क्रिकेट मैदानावर घडत आहे.
मात्र अलिकडील काळातील वाढलेल्या बॉल टेंम्परींगच्या घटना आणि स्मिथ-वार्नर यांचा मार्चमधील बॉल टेंम्परींगमधील सहभाग यामुळे बॉल टेंम्परींगची खूप चर्चा होत आहे.
स्मिथ-वार्नर प्रकरण ताजे असतानाच आता श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदिमलही बॉल टेंम्परींगच्या जाळ्यात अ़डकला आहे.
दिनेश चंदिमलने विडीज विरूद्ध 14 ते 18 जून दरम्यान झालेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बॉल टेंम्परींग केल्याबद्धल एक कसोटी सामन्याची बंदी, दोन डिमेरीट गुण आणि सामन्याचे मानधन कापण्याची शिक्षा आयसीसीकडून झाली आहे.
या बॉल टेंम्परींगचे पहिल्यांदा उजेडात आलेले आणि पहिल्यांदा शिक्षा झालेले प्रकरण म्हणजे पाकिस्तानच्या वकार युनुसचे बॉल टेंम्परींग प्रकरण.
वकार युनुसने 2001 साली श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात बॉलला स्विंग मिळावा म्हणून बॉलची शिलाई उसवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी वकार युनुसला एका एकदिवसीय सामन्याच्या बंदीची घालण्यात आली होती.
या प्रकरणानंतर बॉल टेंम्परींगचे प्रकार आणि प्रकरणे वाढतच गेली. त्यातील काही उघडकीस आली तर काही उघडकीस आली नाहीत.
तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या काळात बॉल टेंप्मरींग केल्याचे खुलासेही केले आहेत.
वकार युनुस हा जागतिक क्रिकेट मधल्या वेगवान गोलंदाजांपैकी एक यशस्वी गोलंदाज आहे.
त्याने पाकिस्तानकडून 262 एकदिवसीय सामन्यात 416 तर 87 कसोटी सामन्यात 373 बळी मिळवले आहेत.
वकार युनुसला क्रिकेट जगतात रिवर्स स्विंगचा किंग म्हणून ओळखले जाते.
महत्वाच्या बातम्या-
–सचिनने जे भारतासाठी केलं तेच ईऑन माॅर्गनने इंग्लंडसाठी करुन दाखवलं
–२२ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला