दिल्ली। काल फिरोज शहा कोटला मैदानावर पार पडलेल्या दिल्ली डेयरडेविल्स विरूद्ध कोलकता नाईट रायडर्स सामन्यात दिल्लीचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर फलंदीज पृथ्वी शॉने अर्धशतकी खेळी केली.
त्यांच्या या खेळीचे चांगलेच कौतुक झाले. पण त्याचबरोबर या सामन्यात बरीच चर्चा झाली ती पृथ्वी शॉने मारलेल्या धोनीसारख्याच हेलिकॉप्टर शॉटची.
शॉने मारलेल्या 2 षटकारांपैकी पहिल्याच षटकाराने त्याने एमएस धोनीच्या प्रसिद्ध असलेल्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून दिली.
त्याने नवव्या षटकात मिशेल जॉन्सनने टाकलेल्या लेंथ बॉलवर मिडविकेटला अगदी धोनीसारखाच हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार खेचला. त्याच्या या हेलिकॉप्टर शॉटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
'SHAW'NDAR shot from Prithvi https://t.co/DfvLpCuJeX via @ipl
— Aratrick (@crlmaratrick) April 27, 2018
शॉने त्याच्या खेळीची सुरूवात संथ केली होती, पण त्यानंतर तो जेव्हा खेळपट्टीवर स्थिर झाला तेव्हा त्याने मोठे फटके मारायला सुरूवात केली. त्याने 44 चेंडूत केलेल्या 62 धावांच्या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांची बरसात केली.
शॉने या सामन्यात कर्णधीर श्रेयस अय्यरलाही भक्कम साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी रचली. अय्यरने काल नाबाद 93 धावांची खेळी केली.
अय्यर आणि शॉच्या अर्धशतकामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 219 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकताला 164च धावा करता आल्या. यामुळे दिल्लीने 55 धावांनी विजय मिळवला.
Speed is very important in every situation, it saves time, it benefits in every work we do.
M.S.Dhoni' s helicopter shot & his speed of Six is more needed to win. #OnePlus6 will also save our time & give us more benefits with its speed & it's amazing features. pic.twitter.com/MQtVY80j6x
— Yash Gandhi (@yashgandhi66) April 25, 2018
यदाकदाचीत अपणास माहीत नसेल तर:
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने 2002 मध्ये इंग्लड विरूद्ध खेळताना असाच हेलिकॉप्टर शॉट मारला होता. यावेळी धोनीचे आंतराष्ट्रीय पदार्पणही झाले नव्हते.
SACHIN HELICOPTER SHOT IN 2002.flv https://t.co/YQjw6LO8c8
— Sharad Bodage (@SharadBodage) April 28, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
–कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग