---Advertisement---

शतक व्हावे म्हणून राहुल द्रविड लाॅर्ड्समध्ये ‘त्याच’ खेळाडूंच्या खुर्चीवर बसला होता, ज्याने…

---Advertisement---

मुंबई । भारतीय संघ संकटात सापडायचा तेव्हा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड हा संकटमोचक बनून संघाला तारायचा. भारताच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या राहुलने अत्यंत कठीण प्रसंगी धावा केल्या. जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मण जेव्हा चालत नसत तेव्हा भारतीय संघासाठी राहुल द्रविड विरोधी संघाबरोबर एकहाती लढायचा. आपल्या कारकिर्दींमध्ये त्याने अनेक ऐतिहासिक खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिले.

शांत आणि संयमी स्वभावाच्या राहुल द्रविडची ‘टेक्निक’ जबरदस्त होती. विरोधी संघातल्या भल्या-भल्या गोलंदाजाला आपली विकेट सहज कधी बहाल करत नसे. क्रिकेटमधल्या यशासाठी  मैदानावर  जितकी मेहनत घ्यायचा तितकाच तो काही अंधविश्वासू गोष्टीवर विश्वास ठेवून टोटके वापरायचा. आज आपण राहुल द्रविड कोणत्या टोटक्यांचा आधार घ्यायचा याची माहिती घेऊ.

राहुल द्रविड नेहमी उजव्या पायातील पॅड बांधायचा. मैदानात उतरताना नेहमी उजवा पाय आधी ठेवायचा. त्यासोबत  फलंदाजीसाठी तयार होताना तो नेहमी प्रथम उजव्या पायावर थायपॅड बांधायचा. 2011 साली इंग्लंड दौऱ्यावर त्याने एका अजब गजब टोटक्याचा आधार घेतला होता. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 330 मिनिटे फलंदाजी करत तडाखेबाज 103 धावांची शतकी खेळी केली. या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सारखे फलंदाज अयशस्वी ठरले असताना राहुल एकहाती लढा देत शतकी खेळी केली.

राहुल द्रविडने जूनमध्ये श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर झालेला कसोटी सामना पाहिला होता. या सामन्यात श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने 193 धावांची धडाकेबाज खेळी केली. सामन्यामध्ये तिलकरत्ने दिलशान लॉर्ड्सच्या बाल्कनीत ज्या ठिकाणी बसला होता ती सीट देखील त्याने पाहिली होती. जेव्हा भारताचा सामना याच मैदानावर सुरू झाला तेव्हा राहुल द्रविडनेही फलंदाजाली जाण्यापूर्वी त्याच सीटवर बसला होता आणि त्याने ही जबरदस्त शतकी खेळी केली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---