कोरोना व्हायरसमुळे क्रिडा क्षेत्र ओस पडले आहे. क्रिडा जगतात सर्व प्रकारचे खेळ रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत. अशात लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटूंनी वेळ घालविण्यासाठी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. तसेच अनेक भारतीय क्रिकेटपटू इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधत आहेत.
काल (२ मे) भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट केले. या दरम्यान दोघांनी मिळून क्रिकेटबद्दल खूप चर्चा केली. पण, अचानक रोहितने बोलताना अपशब्दाचा वापर केला. Rohit sharma used abuse words on instagram live with mohammed shami.
झाले असे की, लाईव्हदरम्यान खराब नेटवर्कचा शमीला खूप त्रास होत होता. यामुळे लाईव्ह सेशनदरम्यान २-३वेळा त्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे रोहित तो संपर्कात येईपर्यंत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होता. शमी संपर्कात आल्यानंतर रोहितने त्याला सांगितले की, “तू येईपर्यंत मी चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत होतो. पण मला कुणी चांगले प्रश्न विचारतच नव्हते. त्यामुळे मी त्यांना म्हणालो की, कोण चांगले प्रश्नच विचारत नाहीये. प्रत्येकजण फक्त हाय, हॅलो करत आहे.”
लाईव्ह सेशनमध्ये शमीने रोहितला त्याच्या वनडेतील ३ द्विशतकांपैकी सर्वात खास द्विशतकाची निवड करण्यास सांगितले. यावर रोहित म्हणाला की, “पहिले द्विशतक माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी पहिल्यांदाच वनडेत एवढ्या धावा केल्या होत्या. दुसऱ्या द्विशतकावेळी त्याने २६४ धावांची तुफानी खेळी करत विक्रम नोंदवला होता. त्यामुळे दुसरे द्विशतकही माझ्यासाठी विशेष ठरले.”
“मात्र, तिसऱ्या द्विशतकाचा आनंद दुप्पट होता. कारण त्यादिवशी मोठ्या खेळीसह माझ्या लग्नाचा वाढदिवसही होता. अशाप्रकारे तिन्ही द्विशतके माझ्यासाठी खास आणि अविस्मरणीय आहेत,” असे रोहितने म्हटले. यावर शमी म्हणाला की, “तु हळूवार सुरुवात करतोस आणि नंतर तू जी फटकेबाजी करायला लागतो, त्याला तोड नाही.”
शिवाय, रोहितने सध्याच्या गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुडला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हटले आहे. रोहित म्हणाला की, “भारतीय संघात चांगल्या गोलंदाजांची कमतरता नाही. पण, जर जगभरातील गोलंदाजांविषयी पाहायचे झाले, तर माझी निवड रबाडा आणि हेजलवुड हे असतील.”
ट्रेंडिंग घडामोडी-
क्रिकेट कारकिर्द संपली की हा धडाकेबाज फलंदाज होणार शुटर, ऑलिंपिक्स…
धोनी मदत करतो पण अर्धवट, धोनीचा प्रतिस्पर्धी खेळाडूचे भाष्य
जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर तुम्हाला शंभर टक्के माहित असणार हे २०…