भारताचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली आहे.
असे असले तरी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर रोहित झेक प्रजास्ताकची राजधानी असेलेल्या एेतिहासिक प्राग शहरात पर्यटानासाठी गेला आहे.
https://www.instagram.com/p/BlYoMlMAfUR/?taken-by=rohitsharma45
रोहितने तो प्रागमध्ये सुट्टीचा आनंद घेत असल्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोवर रोहितचा चांगला मित्र आणि संघ सहकारी असलेल्या युजवेंद्र चहलने मजेशीर कॉमेंट केली होती.
“रोहित मी तुला मिस करतोय” असे चहलने कॉमेंट केली.
त्यावर रोहितची पत्नी रितीकानेही चहलला तितकेच मजेशीर उत्तर दिले.
“पण रोहित आता माझा आहे.” असे रितीका चहलच्या कॉमेंट उत्तर देताना म्हणाली.
यानंतर सोमवारी (23 जुलै) रोहितने चहलला वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन दिलेल्या शुभेच्छामधूनही या दोघांच्या मैत्रीचे दर्शन झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावा अपेक्षा आहे, तुझा हरवलेला दात तुला पुन्हा मिळेल!
-बीसीसीयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच दिली संघात संधी, चुक समजताच काय केले पहाच