शुभमन गिल (Shubman Gill) याला मागच्या काही टी20I सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये. धावा करताना सलामीवीर फलंदाज झगडताना दिसला. आत्तापर्यंत त्याला या फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडण्यात यश आले नाहीये. याच पार्सश्वभूमीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट(Salman Butt) याने गिलच्या टी-20 प्रदर्शनाबाबत मत व्यक्त केले.
अफगाणिस्तानविरुद्ध सध्या चालू असलेल्या टी20I मालिकेत पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याने 12 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal) याला संधी देण्यात आली. त्यामुळे गिलला प्लेइंग 11मध्ये जागा मिळाली नाही. शुभमन गिल याला आपल्या फलंदाजी दृष्टीकोनात बदलावा लागेल, असे सलमान बटला वाटते. अनेक वेळा दमदार सुरुवात करूनही तो स्वस्तात आपली विकेट्स देतो असे मत सलमान बट यांचे आहे.
सलमान बट शुभमन गिल विषयी बोलताना
“मला असं वाटतयं की शुभमन गिलने मागिल काही सामन्यात त्याच्याकडून अपेक्षित असलेली फलंदाजी केली नाही. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. ज्याप्रकारे तो खेळतो त्यानुसार असे दिसते की, त्याच्याकडे अधिक कौशल्य आहे. अलिकडील काही सामन्यात तो थोड्याच धावा करून बाद होतो आहे. पण फॉर्ममध्ये असताना तो इतक्या सहजासहजी बाद होत नव्हता. त्याने विशेष काही करून दाखवयचे नाहीये. फक्त आपल्या फलंदाजीवर लक्ष द्यायला हवे. त्याला हे समजायला हवे की, तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असलला तरी प्रत्येक चेंडूवर आपला हक्क गाजवता येत नाही. तुम्हाला त्या चेंडूच्या मर्जीनुसार खेळावे लागते.”
शुभमन गिलने आपल्या टी20I(T20I) कारकिर्दीची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध केली होते. गिलने आत्तापर्यंतच्या टी20Iमध्ये 14 सामन्यात 25.8 सरासरीने अवघ्या 335 धावा केल्या आहेत. यासोबतचं न्युझीलंडविरुद्ध एक जदबरदस्त शतक ठोकले होते आणि एक अर्धशतकचा पण समावेश आहे. यावर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024मध्ये गिलला संधी दिली जाईल का याकडे पाहावे लागलं.
महत्त्वाच्या बातम्या
‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक
NZ vs PAK: चाहत्याने ‘चाचा’ म्हणल्यावर इफ्तिखार अहमदला राग अनावर; केलं असं काही, पाहा व्हिडिओ