मुंबई – टोटका प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. यश मिळवण्यासाठी अनेक जण टोटक्याचा वापर करतात. भारत, पाकिस्तान अथवा ऑस्ट्रेलिया या देशातील अंधश्रद्दाळू क्रिकेटपटू क्रिकेटमधल्या यशासाठी टोटक्यांचा वापर करायचे. काही जण आपल्या जर्सीचा नंबर बदलायचे तर काही जण सर्वप्रथम आपल्या डाव्या पायाचे पॅड बांधत. काही फलंदाज आपल्या हातातले ग्लोज हातातून सारखे बाहेर काढत. असे प्रकार करताना आपण अनेकदा पाहिले असेलच.
आज आपण अशा एका अंधश्रद्दाळू खेळाडूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याचा टोटका ऐकला की, आपल्याला आश्चर्य वाटेल. ज्याचे नाव आहे नील मॅकेन्झी. 2000 साली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने कसोटीमध्ये तीन हजार तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सोळाशे धावा काढल्या आहेत. यात 7 आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेकडून फारच कमी सामने खेळलेल्या या खेळाडूंचा फर्स्टक्लास क्रिकेट मधला रेकॉर्ड मात्र लाजवाब आहे.
नील मॅकेंझी ने फर्स्ट क्लास करियरमध्ये 280 सामने खेळत 53 शतके ठोकत 19 हजार 41 धावां काढल्या आहेत. यात 86 अर्धशतकांचाही समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये मॅकेंझीने बारा शतकाच्या साहाने 8 हजार 571धावा केल्या. म्हणजे क्रिकेट करिअरमध्ये मॅकेन्झीने एकूण तडाखेबाज 65 शतके ठोकली. नीलम मॅकेन्झीच्या या यशात हात आहे तो टॉयलेट सीटचा. काय तुम्हाला वाचून अक्षरे वाटला असेल याचं. पण हे खर आहे.
नील मॅकेंझीने क्रिकेटमधल्या यशासाठी अनेकदा अनेक अंधश्रद्दाळू होत टोटक्यांचा उपयोग करायचा. आपली फलंदाजी चांगली व्हावी यासाठी ड्रेसिंग रूममधल्या टॉयलेटमधील सर्व सीट खाली करून मैदानात जायचा. त्याचा हा टोटका ऐकून अनेक क्रिकेटपटू बऱ्याचदा आश्चर्य चकीत व्हायचे.
मॅकेंझी अनेक गोष्टींवर अंध विश्वास ठेवायचा. तो खेळपट्टीवरच्या पांढर्याशुभ्र रेषेवर पाय ठेवत नव्हता. गोलंदाजाचा सामना करण्यापूर्वी येतो आधी डाव्या साइडला पाहायचा. प्रथम तो स्क्वेअरलेग त्यानंतर फाईन लेग आणि मग तो गोलंदाजाकडे पाहत फलंदाजी करायचा प्रत्येक चेंडूवर तो असाच करायचा.
अनेक गोष्टींवर अंधविश्वास ठेवणाऱया नील मॅकेन्झीवर ड्रेसिंग रूममधले त्याचे सहकारी मात्र त्यांची खिल्ली उडवायचे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या आणि अनेक अंध विश्वासू गोष्टींचा उपयोग करूनही नील मॅकेन्झीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द मात्र दिर्घकाळ टिकवून ठेवता आली नाही.