दक्षिण अफ्रिका संघाचा फलंदाज जुबेर हमजा याला आयसीसीच्या अँटी डोपिंग कायद्या अंतर्गत दोषी ठरवले गेले आहे. या कायद्यानुसार बंदी असलेल्या डायूरेटिक फुरोसेमाइडचे सेवन जुबेर हमजाने केले होते. चालू वर्षीच्या १७ जानेवारी रोजी जुबेरची डोपिंग चाचणी केली गेली होती, ज्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने याविषयी माहिती दिली आहे.
क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने जुबेर हमजा (Zubayr Hamza) याला निलंबित केले आहे. बोर्डने असेही स्पष्ट केले की, जुबेर या चाचणीवर कसल्याही प्रकारचा विवाद किंवा संशय घेत नाही. तो पूर्णपणे सहकार्य करत आहे. बोर्डने सांगितल्याप्रमाणे जुबेरला तो निर्दोष असल्याचे सिद्ध करता येऊ शकते.
क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने (CSA) सांगितले की, “जुबेरला कळाले आहे की, तो पदार्थ त्याच्या शरीरात कसा केला आहे. तो आता त्याचे पुरावे सादर करेल की, त्याने जाणूनबुजून किंवा हलगर्जीपणाने या पदार्थाचे सेवन केले नाही.” डोपिंग कायद्यानुसार बंदी असलेला फुरोसेमाइड पदार्थ प्रदर्शन सुधारण्यासाठी वापरले जात नाही, पण या पदार्थामुळे खेळाडूंनी सेवन केलेले इतर पदार्थ लवपले जाऊ शकतात.
अशा परिस्थितीत जुबेरसोबत क्रिकेट दक्षिण अफ्रिका, दक्षिण अफ्रिका क्रिकेटर्स बोर्ड आणि वेस्टर्न क्रिकेट असोसिएशन या संघटना उभ्या आहेत. जुबेरच्या १७ जानेवारी रोजी झालेल्या डोपिंग चाचणीचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता. त्यानंतर देखील तो न्यूझीलंडविरुद्धचा पहिल्या कसोटी सामन्यात खेळला होता.
Proteas batter Zubayr Hamza is cooperating fully with the ICC after testing positive for a prohibited substance.
Full details: https://t.co/RSBX6GCha2 pic.twitter.com/BJrVpapsCJ
— Proteas Men (@ProteasMenCSA) March 23, 2022
२६ वर्षीय जुबेर हमजाने २०१९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते. तो दक्षिण अफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेट खेळणारा १०० वा खेळाडू बनला होता. मागच्या वर्षी नेदरलंडविरुद्धच्या सामन्यातून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे ही मालिका पुढे खेळली गेली नव्हती.
जुबेरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये २१२ धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने ६२ धावा केल्या होत्या, जी त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळ होती. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी जुबेरची निवड केली गेली होती, पण घरगुती कारणांमुळे त्याने या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती.
महत्वाच्या बातम्या –
लखनऊ फ्रँचायझीच्या जर्सीवरील ‘गरूड’ चिन्हाचा अर्थ काय? खुद्द संघ मालकानेच दिलं उत्तर
लखनऊ फ्रँचायझीच्या जर्सीवरील ‘गरूड’ चिन्हाचा अर्थ काय? खुद्द संघ मालकानेच दिलं उत्तर