---Advertisement---

दक्षिण अफ्रिकेची महिला क्रिकेटर डेन वॅन निकर्कने संघ सहकारी मरझीन केपशी विवाहबद्ध

On: मंगळवार, जुलै 10, 2018 9:20 AM
---Advertisement---

दक्षिण अफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वॅन निकर्कने तीची संघ सहकारी असलेली अष्टपैलू मरझीन केपशी शनिवारी (८ जुलैला) विवाह केला आहे.

याची माहिती अष्टपैलू मरझीन केपने तीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे.

https://www.instagram.com/p/Bk8WsmjgWSh/?hl=en&taken-by=kappie777

२००९ साली विश्वचषका दरम्यान या दोघींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

डेन वॅन निकर्क आणि मरझीन केप या दोघींची क्रिकेट कारकिर्दही बरोबरीने बहरली आहे. दोघींची क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे.

डेन वॅन निकर्क एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२५ बळी मिळवले आहेत. ती दक्षिण अफ्रिकेसाठी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादित अव्वल स्थानी आहे. तर  मरझीन केप ९९ बळी घेत या यादित तिसऱ्या स्थानी आहे.

तर दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादित वॅन निकर्क १,७७० धावांसह चौथ्या स्थानी आहे. मरझीन केपनेही १,६१८ धावा करुन सहावे स्थान मिळवले आहे.

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू अॅलेक्स ब्लॅकवेलने  इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू लेनसी अॅसक्यू सोबत विवाह केला होता.

तर सध्या न्युझीलंडकडून खेळत असलेल्या महिला क्रिकेटपटू अॅमी सॅचरव्हाइट आणि ली थाहुहू यांनीही मार्च २०१७ मध्ये विवाह केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अॅरॉन फिंचने टी20 क्रिकेट पाठोपाठ क्रमवारीतही घडवला इतिहास 

-ये कौन हैं, कहासे पकडके लाते हो? गांगुलीच्या राग जेव्हा अनावर झाला  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment