१९ वर्षाखालील भारतीय संघाने फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंका युवा संघाला १३५ धावांनी पराभूत केले.
भारतीय संघाने मंगळवारी (७ ऑगस्ट) ताइरोने फर्नांडो स्टेडियम, मोरतोवा येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यातील विजयाबरोबर ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
भारताने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. यामध्ये देवदत्त पडिक्कल ७१ धावा, आर्यन जुयाल ६० धावा आणि यश राठोड ५६ धावा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकात ६ बाद २७८ धावा केल्या होत्या.
विजयासाठी भारताच्या २७८ धावांंचा पाठलग करताना श्रीलंका ३७.२ षटकात सर्वबाद १४३ धावाच करु शकले.
यामध्ये श्रीलंकेकडून नवोत प्रणाविथनाने सर्वाधिक ४५ धावा केल्या. नवोत प्रणाविथना वगळता एकाही श्रीलंकन फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
आपल्या २७८ धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला.
यामध्ये आयुष बदोनी आणि हर्ष त्यागीने प्रत्येकी तीन विकेट मिळवल्या.
या एकदिवसीय मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना शुक्रवारी (१० ऑगस्ट) ताइरोने फर्नांडो स्टेडियम, मोरतोवा येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक-
भारत- ५० षटकात ८ बाद २७८, देवदत्त पडिक्कल ७१, सुदन मेंडीस २/३७.
श्रीलंका- ३७.२ षटकात सर्वबाद १४३ , नवोत प्रणाविथना ४५, आयुष बदोनी ३५/३.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-मोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान